जल जीवन मिशन अंतर्गत मावळ तालुक्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. तसेच आताही अनेक गावांत या योजनांचे काम सुरु असून अनेक गावांत भूमीपूजन होऊन पाणीपुरवठा योजनांचे काम मार्गी लागत आहे. पवन मावळ विभागातील काले कॉलनी येथील पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन देखील नुकतेच पार पडले. ( Jal Jeevan Mission Bhumipoojan Ceremony Of Tap Water Supply Scheme At Pavananagar Kale Colony Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काही दिवसांपूर्वीच आमदार सुनिल शेळके यांनी वडगाव येथे तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी प्रस्तावित आणि प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सुचना केल्या होत्या.
मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील ग्रुप ग्रामपंचायत काले-पवनानगर अंतर्गत काले कॉलनी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी (31 मार्च) संपन्न झाला. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत होणाऱ्या या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 3 कोटी 53 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. या भूमिपूजन समारंभास पवन मावळातील जेष्ठ मान्यवर, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पवनमावळातील फुल उत्पादक शेतकऱ्याला जिल्हा परिषदेचा ‘आदर्श कृषीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार, कौतुकाचा होतोय वर्षाव
– लायन्स पॉइंट इथे 600 फूट खोल दरीत पडून मुलाचा मृत्यू, अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात शिवदूर्ग टीमला यश