व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनमावळातील फुल उत्पादक शेतकऱ्याला जिल्हा परिषदेचा ‘आदर्श कृषीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार, कौतुकाचा होतोय वर्षाव

दरवर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना, तालुका पंचायत समितीच्या शिफारशीने, जिल्हा परिषदेकडून 'आदर्श कृषीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार दिला जातो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 31, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
Dnyaneshwar-Thakar-From-Pavan-Maval

Photo Courtesy : Abhishek Bodake


मावळ तालुक्यातील फुल उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर ठाकर यांना नुकताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘आदर्श कृषीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरवर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना, तालुका पंचायत समितीच्या शिफारशीने, जिल्हा परिषदेकडून ‘आदर्श कृषीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार दिला जातो.

त्यानुसार यंदा पुण्यातील अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, शरद आदर्श कृषीग्राम, कृषीनिष्ठ शेतकरी, आदर्श गोपालक, उत्कृष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी व शिक्षण विभागातील विजेते स्पर्धक यांना जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ( Dnyaneshwar Thakar From Pavan Maval Taluka Awarded Pune Zilla Parishad Ideal Farmer Award )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शालिनी कडू, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पिंगट साहेब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती बाबुराव वायकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम विधाते, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचरणे, जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – येळसे गावातील काळूबाई मंदिर परिसराचे होणार काँक्रिटीकरण, विश्वजीत बारणेंच्या हस्ते भूमीपूजन संपन्न

पवना फुल उत्पादक संघटनेचे सचिव शेतकरी ज्ञानेश्वर ठाकर यांचे येळसे येथे 3 एकर 20 गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊस असून त्यामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या देशी-विदेशी गुलाबांची शेती केली आहे. संपूर्ण देशासह प्रदेशात देखील त्यांचा गुलाब निर्यात होत असतो. ते पारंपारिक पिकेही दरवर्षी घेत असतात. किड नियंत्रणासाठी गंध सापळे, गोबरगॅस, सौर उर्जेवर चालणारे सापळे, शेडनेट हाऊस आदी वेगवेगळे प्रयोग ही त्यांनी आपल्या शेतात केले आहेत. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल ठाकर यांनी मावळ पंचायत समितीचे व पुणे जिल्हा परिषदेचे आभार मानले.

अधिक वाचा –
– ‘दिव्यांग बांधवांना पेन्शन वाढवून आणि वेळेवर मिळावी’, तळेगाव शहर भाजपाचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
– पती कामानिमित्त गुजरातला अन् पत्नी मुलांसह माहेरी, चोरट्याने ‘हीच ती वेळ’ म्हणत घर केले साफ, उर्से गावातील घटना


dainik maval jahirat

Previous Post

‘दिव्यांग बांधवांना पेन्शन वाढवून आणि वेळेवर मिळावी’, तळेगाव शहर भाजपाचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

मोठी बातमी : ‘दिल्लीत ये, तुला उडवून टाकतो’, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjay-Raut

मोठी बातमी : ‘दिल्लीत ये, तुला उडवून टाकतो’, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.