तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात चोरट्यांचा कहर वाढताना दिसत आहे. अनेक छोट्या मोठ्या चोरीच्या घटना सध्या समोर येत असून यात मंदिरेही सुटलेली नाहीत. समोर आलेल्या माहितीनुसार दिनांक 7 एप्रिल रोजी तळेगाव शहरातील मंत्रा सिटी 360 या उच्चभ्रू सोसायटीत तब्बल 2 लाख 45 हजार रुपयांच्या चोरीची धक्कादायक घटना घडली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या प्रकरणी, फिर्यादी संग्राम उदय राजेष शिर्के (वय 30, व्य. नोकरी, रा. बी विंग, रूम नं. 201, मंत्रा सिटी 360, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 454, 380 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 07 एप्रिल रोजी दुपारी दीड ते तीन दरम्यान बी विंग, रूम नं. 201, मंत्रा सिटी 360, तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) इथे ही घटना घडली. ( gold looted in mantra city 360 society in Talegaon Dabhade case registered against an unknown thief )
हेही वाचा – जमीन विक्री व्यवहारात तळेगाव दाभाडे येथील महिलेची 30 लाखांची फसवणूक, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारिख, वेळी आणि ठिकाणी कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या राहत्या घराचे दरवाज्याचे लॉक उघडून घरामध्ये प्रवेश केला, आणि बेडरूममधील लाकडी कपाटातील 2,45,000 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने यांची चोरी केली आहे. तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे पोसई इंगळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– शिरे शेटेवाडी येथील आंद्रा धरण पुनर्वसन भूखंड वाटप कार्यक्रम, एकूण 110 लाभार्थी कुटुंबांना प्लॉट वाटप
– ‘तब्येत बरी नसल्याने मी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन विश्रांती घेत होतो, आणि तुम्ही….’, अजित पवारांनी झापले