भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आद्यक्रांतीवीर ( Revolutionary ) जननायक बिरसा मुंडा ( Birsa Munda ) यांचे अनन्यसाधारण योगदान राहिले आहे. त्यांच्याच पावलांवर आणि विचारांवर चालत भारताच्या इतर भागातही आदिवासी समाजातील क्रांतीकारकांनी इंग्रजांविरोधात बंड पुकारले होते. क्रांतिवीर नाग्या महादु कातकरी ( Nagya Mahadu Katkari ) हे त्यांपैकीच एक होते. इंग्रजांनी केलेल्या जंगल कायद्याविरोधात चिरणेरच्या जंगलात तेव्हा सत्याग्रह पुकारण्यात आला होता. त्यावेळी इंग्रजांनी केलेल्या अमानुष गोळीबारात नाग्या महादु कातकरी यांना वीरमरण प्राप्त झाले होते. ( Commemoration Of Revolutionary Nagya Mahadu Katkari )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 25 सप्टेंबर हा क्रांतिवीर नाग्या कातकरी यांचा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) बेलज ( Belaj ) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आदिवासी शिवलिंग तरुण मंडळ बेलज यांनी ढोल ताशांच्या गजरात अगोदर क्रांतिकारकाच्या प्रतिमेची मिरवणूक काढली. त्यानंतर आदिवासी विचार मंच चे अंकुश मोरमारे, अंकुश चिमटे, कविता मोरमारे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ तसेच कातकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मावळ तालुका बिरसा ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. ( Commemoration Of Revolutionary Nagya Mahadu Katkari at Belaj In Maval Taluka )
अधिक वाचा –
PHOTO : आमदार सुनिल शेळकेंनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन, मावळवासियांसाठी केली प्रार्थना I नवरात्रोत्सव 2022
मावळमध्ये साधेपणाने मात्र उत्साहात बैलपोळा साजरा; शिळींब गावातील बैलांची सजावट ठरली आकर्षणाचा केंद्र