तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात सोमवारी (दिनांक 17 एप्रिल) सर्व दिव्यांग बांधव मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या दालनामध्ये मासिक अनुदानाबाबत जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चेसाठी दाखल झाले होते. ( talegaon dabhade city disabled citizen will get 3 thousand subsidy monthly )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जनसेवा विकास समितीच्या वतीने प्रवक्ते मिलिंद अच्युत, कार्याध्यक्ष कल्पेश भगत, नगरसेवक सुनील कारंडे, रोहित लांघे, निलेश पारगे, अनिल भांगरे आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांच्या वतीने मुख्याधिकारी सरनाईक यांच्याशी चर्चा केली. मुख्याधिकारी सरनाईक यांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्याशी फोन द्वारे चर्चा करून तीन हजार रुपये मासिक अनुदान देण्यास तत्वतः मान्यता दिली. तसेच एकूण बजेट मधील वाढीव तरतुदी करिता योग्य ती पावले उचलून दिव्यांग बांधवांच्या मासिक अनुदानाचा प्रश्न सोडवण्यात आला.
तळेगाव शहरातील सुमारे दोनशे दिव्यांग बांधव नगरपरिषदेच्या प्रांगणामध्ये उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग संस्थेचे किशोर कुलकर्णी, राजेंद्र थोरात, मनोज हब्बू, निखिल बोत्रे रंजना गोडसे, विठ्ठल हिंनकुले, स्वप्निल पाटील, किशोर दिघे तसेच बहुसंख्य महिला व बाल दिव्यांग देखील उपस्थित होते.
जनसेवा विकास समितीच्या वतीने मुख्याधिकारी सरनाईक यांना लेखी पत्र देऊन मासिक अनुदान तीन हजार रुपये करण्याबाबत विनंती केली होती. त्या विनंतीला सकारात्मक साथ देत मुख्याधिकारी सरनाईक यांनी जनसेवा विकास समितीला लेखी पत्र देऊन तीन हजार रुपये मासिक अनुदान देणार असल्याचे जाहीर केले.
अधिक वाचा –
– महिलांच्या विविध समस्यांबाबत भाजपा महिला आघाडीकडून तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन
– टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत 34 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू, टाकवे-वडेश्वर रोडवरील घटना