देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील किवळे इथे एक होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी (दिनांक 17 एप्रिल) रोजी सायंकाळी सव्वापाच ते साडेपाचच्या दरम्यान झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे रावेत पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेंगलोर – मुंबई हायवे, किवळे ओव्हर ब्रिज जवळ, सर्व्हिस रोड लगत शार्वी हॉटेलचे जवळ असलेला जाहीरातीचा होर्डींग पंक्चरच्या दुकानावर पडला. यावेळी दुकानात निवाऱ्यासाठी थांबलेल्या लोकांच्या अंगावर होर्डिंग्ज पडल्यामुळे त्यामध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अनिता उमेश रॉय (वय 45, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड), शोभा विजय टाक (वय 50, रा. पारशी चाळ, देहूरोड), वर्षा विलास केदारी (वय 40, रा. शितळानगर, देहूरोड), भारती नितीन मंचक (वय 30, रा. शितळानगर, देहूरोड), रामअवद प्रल्हाद आत्मज (वय 29, रा. देहूरोड, मूळ गाव उत्तर प्रदेश) असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याची नावे आहेत.
तर, विशाल शिवशंकर यादव (वय 20, रा. उत्तर प्रदेश), रहमद मोहम्मद अन्सारी (वय 21, किवळे), रिंकी दिलीप रॉय (वय 45, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहे. तिनही जखमींना नजिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले दुर्घटनेच्या ठिकाणा शेजारी सुरू असलेल्या बांधकाम साईटवर काम करत होते.
अधिक वाचा –
– ‘अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी’ – आमदार सुनिल शेळके
– तळेगाव दाभाडे शहरातील दिव्यांग बांधवांना पूर्ववत 3 हजार रुपये मासिक अनुदान मिळणार