पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया ( Akshaya Tritiya 2023 ) या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ( Dagadusheth Halwai Ganapati ) 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभा-यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय तृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. ( on occasion of akshaya tritiya offering 11 thousand mangoes to dagdusheth halwai ganapati pune )
यापूर्वी पहाटे 4 ते सकाळी 6 पर्यंत गायक अविनाश चंद्रचूड, विश्वजित जोशी, सावनी रवींद्र यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी 8 वाजता विशेष गणेशयाग आणि रात्री 9 वाजता भजन विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळाच्यावतीने उटीचे भजन झाले. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– महिला सन्मान योजनेचा पुणे जिल्ह्यात 17 लाखाहून अधिक महिला प्रवाशांना लाभ; एसटीला 6 कोटी 42 लाखांचे उत्पन्न
– आरपीआय वाहतूक आघाडीकडून पिंपरी येथील खराळवाडीमध्ये इफ्तार पार्टी, सर्वधर्मीय समाजबांधव झाले सहभागी