इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यावर सट्टा लावणाऱ्या मुंबईतील दोन बुकींसह पाच जणांना पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. लोणावळा परीसरातील तुंगार्ली गावच्या हद्दीत बंगला भाडेतत्वावर घेऊन त्यामध्ये हा सट्टाबाजार सुरू होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे ग्रामीण एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून राजविनसिंग मनजितसिंग बांगा (वय 27, क्लब व्यवसाय, रा. वडाळा ट्रक टर्मिनल, मुंबई), मस्कीनसिंग रजेद्रसिंग अरोरा (वय 30, क्लब व्यवसाय रा पंजाबी कॉलनी, सायन कोळीवाडा) यांसह शषांक महाराणा (रा. प्रतिक्षानगर सायन ईस्ट), ईफ्तेकार ऊर्फ इमरान खान (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही), षेन्टी (पुर्ण नाव माहित नाही) रा. सायन ईस्ट कोळीवाडा) यांच्यावर भादवी कलम 420, 465, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4(अ), भारतीय टेलिग्राफ अँक्ट कलम 25 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडून राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट संघादरम्यान खेळावर सट्टा लागणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असता, मुंबईतील दोन सट्टेबाजांनी लोणावळा परिसरात तुंगार्ली गावच्या हद्दीत भाडेतत्वावर बंगला घेतल्याचे उघडकीस आले. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने निसर्ग बंगलो सोसायटीतील बंगला क्रमांक तीनवर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 7 मोबाईल, लॅपटॉप साहित्यासह एकूण दीड लाख रूपयांचा ऐवज जप्त केला. लोणावळा पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 : महाविकास आघाडीच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ अन् विजयाचा ‘एल्गार’
– लोणावळ्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते महेश केदारी यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी