लोणावळा जवळ टायगर पॉईंट इथे वेळेचे बंधन न पाळणाऱ्या 8 विनापरवाना दुकान व्यावसायिकांवर लोणावळा विभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रविवार, दिनांक 23 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS सत्यसाई कार्तिक आणि लोणावळा ग्रामीण पोलीस यांची टीम यात सहभागी होती. पहाटे चार वाजता आतवण टायगर पॉईंट इथे पर्यटनस्थळी काही विनापरवाना टपरी व्यावसायिक वेळेचे बंधन पाळत नसल्याचे दिसून आले.
त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 नुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढे वेळेचे बंधन पाळून व्यवसाय करावा, सकाळी सात ते रात्री सात या वेळेतच व्यवसाय करावा आणि पर्यटकांनी देखील इथे सायंकाळी सात नंतर जावू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! रेल्वे स्टेशनवर खून झालेल्या युवकाच्या मारेकऱ्याला एका तासात गजाआड करण्यात कामशेत पोलिसांना यश
IPS सत्यसाई कार्तिक यांसह सुभाष शिंदे, लोणावळा ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने, केतन तळपे, मच्छीद्र पानसरे, प्रणय कुमार उकिरडे आदी कारवाईवेळी सहभागी झाले होते. ( lonavala rural police take action against tapri owner who do not follow time limit at tiger point )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पवना धरणात युवक बुडाला, आपदा मित्रांकडून सर्च ऑपरेशन सुरु
– जमिनीची खरेदी-विक्री करताना ‘या’ 5 गोष्टी जरूर तपासा, अन्यथा भविष्यात येऊ शकतात अनेक अडचणी; वाचा सविस्तर