अत्यंत रंगतदार आणि चुरशीची झालेली मावळ तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आणि या निवडणुकीचा अंतिम निकाल आता समोर आला आहे.
मावळ तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शुक्रवारी (दिनांक 28 एप्रिल) मतदान झाले, या मतांची मोजणी आज (शनिवार, दिनांक 29 एप्रिल) रोजी करण्यात आली. राष्ट्रवादी प्रणीत महाविकास आघाडी मित्र पक्ष पुरस्कृत सहकार पॅनल आणि भाजप प्रणीत छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनल अशा दोन पॅनलमध्ये ही सरळ लढत झाली. एकूण 18 जागांसाठी 40 उमेदवार उभे होते. दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता, मात्र प्रत्यक्षात निवडणूकीच्या निकालात महाविकास आघाडी सहकार पॅनलचे तब्बल 17 उमेदवार निवडून आल्याने बाजार समितीवर मविआचा झेंडा रोवला गेला आहे. ( Maval Agricultural Income Market Committee Election 2023 Final Result maha vikas aghadi panel win see votes distribution )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल
1) कृषि पंतसंस्था मतदारसंघात सर्वसाधारण (7 जागा) एकूण 643 मते अवैध 48 मते
1) दिलीप नामदेव ढोरे (351), 2) संभाजी आनंदराव शिंदे (343), 3) सुभाष रघुनाथ जाधव (350), 4) विलास सदाशिव मालपोटे (375), 5) बंडू दामू घोजगे (353), 6) मारुती नाथा वाळुंज (340), 7) साईनाथ दत्तात्रय मांडेकर (350)
8) शत्रुघ्न रामभाऊ धनवे (219), 9) निलेश विष्णू मराठे (233), 10) बंडू तुकाराम कदम (225), 11) सुभाष रामभाऊ देशमुख (230), 12) विशाल बबनराव भांगरे (230), 13) प्रसाद प्रकाश हुलावळे (238), 14)खंडू बाळाजी तिकोने (217), 15) सुनील तानाजी दाभाडे (002)
2) कृषि पतसंस्था महिला एकूण 643 मते अवैध 20 मते
1) सुप्रिया अनिल मालपोटे (370), 2) अंजली गोरख जांभुळकर (368)
3) कांचन सुभाष धामणकर (216), नंदाताई देवराम सातकर (256)
3) कृषि पतसंस्था ओबीसी अवैध मते 20,
1) शिवाजी चिंधु असवले(366)
2) एकनाथ नामदेव पोटफोडे (257),
4) कृषि पतसंस्था वि ज / विमुक्त जाती जमाती अवैध मते 33 (1 जागा)
1) नथु शंकर वाघमारे (371)
2)जितेंद्र काशिनाथ परदेशी (10)
3) शरद परशूराम साळुंखे (229)
5) ग्रामपंचायत सर्वसाधारण (2 जागा) एकूण मतदान 836 अवैध 21 मते
1) नामदेव नानाभाऊ शेलार (426), 2) विक्रम प्रकाश कलवडे (456)
3)योगेश गजानन राक्षे (399), 4)शिवराम मारुती शिंदे (320)
6) ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती, अवैध 19 मते (1 जागा)
1) विलास बबन मानकर (424)
2) अंकुश ज्ञानदेव सोनवणे (393)
7) ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल, अवैध 25 मते, (1 जागा)
1) अमोल अरुण मोकाशी (497)
2) अस्लम जमील शेख (314)
8) व्यापारी व आडते (2 जागा ) एकूण मते 101 अवैध मत 1
1) नामदेव ज्ञानेश्वर कोंडे (48), 2) भरत दशरथ टकले(50)
3) महेंद्र छगनलाल ओसवाल (39), 4) प्रकाश रामभाऊ देशमुख (36),
5) परशुराम कंकाराम मालपोटे (08), 6)नवनाथ पांडुरंग हारपुडे (16)
9) हमाल तोलारी (1 जागा) एकूण मते 10 सर्व मते वैध
1) शंकर अंतू वाजे (8)
2) हनुमंत ईश्वर मराठे (2)
अधिक वाचा –
– पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी उपाययोजना करा – खासदार श्रीरंग बारणे
– आमदार सुनिल शेळकेंकडून भाजे लेणी परिसरात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी