महिंद्रा ॲक्सेलो आणि कान्हे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आलेल्या ‘फ्युचरिस्टिक कॉम्प्युटर क्लासरुमचे’ उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते रविवारी (दिनांक 30 एप्रिल) रोजी करण्यात आले. कोरोनाचे संकट आल्यानंतर सर्वत्र डिजिटल शिक्षणाचा प्रसार सुरू झाला. इ लर्निंग, मोबाईल शिक्षण असा प्रवास करत जिल्हा परिषद शाळांमध्ये आता फ्युचरिस्टिक क्लासरूम सुरू होताना दिसत आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कान्हे शाळेतील फ्युचरिस्टिक क्लासरुममध्ये 28 संगणक संच, एक पोडियम मॉनिटर आणि स्क्रीन बनवण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञानाचा शाळेतच अभ्यास करता येईल. संगणकीय ज्ञान ही काळाची गरज असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळाले पाहिजे, ही बाब लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महिंद्रा ॲक्सेलो कंपनी व ग्रामपंचायतीने केलेला उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे. ( Ajit Pawar inaugurates futuristic classroom at Kanhe Phata based Zilla Parishad School Maval Taluka )
हेही वाचा – ‘भावी मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार’, मावळ तालुक्यात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, सर्वत्र चर्चा
यावेळी आमदार सुनिल शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महिंद्रा ॲक्सेलोचे व्हाईस प्रेसिडेंट दिवाकर श्रीवास्तव, लक्ष्मण महाले, माजी सभापती बाबुराव वायकर, दिपक हुलावळे, सुभाषराव जाधव, गुलाबकाका म्हाळसकर, साहेबराव कारके, सुनिलभाऊ ढोरे, नामदेवराव दाभाडे, शांताराम कदम, नारायणराव ठाकर, आशिष ढोरे, अंकुश आंबेकर, कैलास गायकवाड, संदीप आंद्रे, कान्हे सरपंच विजय सातकर, उपसरपंच किशोर सातकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, मुख्याध्यापिका शोभा वहिले, नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीवरील वाडिवळे येथील पुलाच्या कामास सुरुवात, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा अंतिम निकाल! मविआच्या सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता, पाहा कुणाला किती मते मिळाली