भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बुधवार (दिनांक 3 मे) रोजी जाहीर झाली. यावेळी मावळ तालुक्याचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बाळा भेगडे यांच्या निवडीनंतर मावळ तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट पसरली.
गुरुवारी (दिनांक 4 मे) वडगाव मावळ इथे शेकडो कार्यकर्त्यांनी बाळा भेगडे यांचे अभिनंदन केले. परंतू मावळमधील फक्त बाळा भेगडे यांनाच प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे असे नाही, तर आणखीन दोन जणांचीही प्रदेश कार्यकारिणीत निवड झाली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कोण आहे ते पदाधिकारी?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. यात बाळा भेगडे यांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. मात्र बाळा भेगडे यांच्यासह मावळ भाजपातील प्रमुख नेते गणेश भेगडे आणि जितेंद्र बोत्रे यांचीही प्रदेश कार्यकारिणीत निवड झाली आहे.
सध्या भाजपाचे पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष असलेले गणेश भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी विशेष निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे सचिव असलेले जितेंद्र बोत्रे यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. ( Bala Bhegade Jitendra Botre and Ganesh Bhegade apointed in Maharashtra Pradesh Bharatiya Janata Party executive body )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ अंतर्गतची कामे मिशन मोडवर पूर्ण करा – जिल्हाधिकारी
– श्री विठ्ठल परिवार मावळ व सकळ दिंडी नियोजन समिती यांकडून कान्हे इथे बाल वारकरी प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या