श्री विठ्ठल परिवार मावळ व सकळ दिंडी नियोजन समिती यांकडून बाल वारकरी प्रशिक्षण कार्यशाळा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 4 मे ते दिनांक 16 मे या कालावधीत कान्हे इथे हे शिबिर संपन्न होणार आहे. जिल्हा परिषद शाळा, कान्हे (ता. मावळ) इथे हे शिबिर होणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री विठ्ठल परिवार मावळ आणि सकाळ दिंडी नियोजन समितीने बाल वारकऱ्यांसाठी ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. या शिबिरातील वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज निवासी व्यवस्था, सकस व सात्विक आहार, वारकरी शिक्षण संस्थेतील अध्यापकांचे मार्गदर्शन, महाराष्ट्रातील व मावळ तालुक्यातील आचार्य व कीर्तनकार यांचे मार्गदर्शन, पिण्यासाठी फिल्टर पाणी असेल. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही नियम व अटी आहेत. ज्यात, विद्यार्थ्यांना मोबाईलवर त्या संदर्भातील उपकरणे वापरण्यास मनाई असेल, शिबिरात ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्या विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख शक्यतो परिधान करावा, विद्यार्थ्यांनी वही आणि पेन घेऊन येणे, प्रवेश घेताना दैनंदिन लागणाऱ्या वस्तू स्वतः घेऊन येणे असे काही नियम असणार आहेत.
शिबिरातील दैनंदिन कार्यक्रम;
दैनंदिन कार्यक्रमात, पहाटे पाच ते सहा रियाज होईल, त्यानंतर सकाळी सहा ते साडेसहा पर्यंत योगा होईल, त्यानंतर साडेसात ते आठ पर्यंत प्रार्थना, आठ ते साडेआठ नाष्टा, नऊ ते साडेदहा गीता पाठ, दहा ते बारा मृदुंग व गायन पाठ, बारा ते एक विठ्ठल जप, एक ते दोन भोजन, दोन ते चार विश्रांती, चार ते पाच व्याख्यान, पाच ते साडेसहा लाठीकाठी, साडे सहा ते आठ हरिपाठ, आठ ते नऊ भोजन, नऊ ते साडेनऊ संत चरित्र
या शिबिरात अध्यापक म्हणून पंडित किरण परळीकर गुरुजी, हभप हनुमान महाराज शिंदे आणि हभप दीपक महाराज मुंडे हे असणार आहेत. नियोजन समितीतील हभप लक्ष्मण महाराज सातकर, हभप किसन महाराज केदारी, हभप संतोष महाराज मलपोटे, हभप बाळासाहेब महाराज आडकर, हभप संतोष महाराज शेलार, हभप गोपीचंद महाराज कचरे, हभप जनार्दन महाराज ठाकर, हभप बाबाजी महाराज बालगुडे हे देखील यात सहभागी असणार आहेत. तसेच, हभप गणेश महाराज जांभळे ( अध्यक्ष श्री विठ्ठल परिवार मावळ) हभप दिलीप महाराज केंद्रे (अध्यक्ष कीर्तन महोत्सव समिती) हभप नितीन महाराज काकडे (धअध्यक्ष श्री विठ्ठल नाम जप समिती) आणि श्री विठ्ठल परिवार मावळ गाव प्रतिनिधी आणि विभाग प्रमुख हे सर्वजण असणार आहेत. ( Child Warkari Training Camp at Kanhe by Shri Vitthal Parivar Maval and Sakal Dindi Planning Committee )
अधिक वाचा –
– माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड
– ‘शिवदुर्ग मित्र’कडून आयोजित ‘लोणावळा बोल्डरींग चॅम्पियनशिप 2023’ स्पर्धा उत्साहात संपन्न, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी