वराळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी अश्विनी विवेक शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
वराळे ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 1 मधील ग्रामपंचायत सदस्या रुपाली आढाळे यांनी राजीनामा दिल्याने जागा रिक्त झाली होती. यावर पोटनिवडणूक जाहीर झाली. यात सदस्यपदासाठीच्या (अनुसूचित जाती स्त्री) रिक्त जागी अश्विनी शिंदे यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अश्विनी शिंदे यांच्या निवडीनंतर त्यांनी समर्थकांसह आमदार सुनिल शेळके यांची भेट घेतली. यावेळी माजी संरपच निलेश मराठे (मावळ तालुका खरेदी विक्री संघ संचालक), ग्रामपंचायत सदस्य विकास मराठे, निलेश मराठे, गणेश मराठे, मा उपसरपंच, रामदास मांडेकर, मा उपसरपंच संतोष मराठे, अतुल मराठे, गणेश मराठे, वि.वि. सोसायटी चेअरमन राम मराठे, अंकुश शिंदे, संकेत जगताप, मयुर शिर्के, प्रसाद शिंदे, प्रणव काबंळे, प्रशिक सोनवणे, सुमेध शिंदे उपस्थित होते. ( Varale Village Gram Panchayat Member By Election Ashwini Shinde Elected Unopposed Maval Taluka )
राज्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि रिक्त सरपंचपदाच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 18 मे रोजी यासाठी मतदान होणार आहे. मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी 18 मे रोजी निवडणूक होणार आहे. पैकी वराळे ग्रामपंचायतीतील पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे.
अधिक वाचा –
– हजारो बौद्ध उपासकांच्या उपस्थितीत कार्ला लेणी इथे ‘महाबुद्ध वंदना’ संपन्न । बुद्धपौर्णिमा 2023
– “…संघटनेत कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक”, वाचा शरद पवार नेमकं काय म्हणाले?
– चलो पवनानगर..! पवना धरणग्रस्तांचा 9 मे रोजी काले कॉलनी ते पवनाधरण बंधाऱ्यापर्यंत भव्य मोर्चा