“वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा” हे अभियान पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबवण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात आणि पहिला टप्पा दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी एकविरा गड आणि कार्ला लेणी येथील स्वच्छ्ता करून सुरू करण्यात आला. त्यानंतर दिनांक 3 मे रोजी किल्ले लोहगड आणि परिसर स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात टायगर पॉइंट आणि परिसरात दिनांक 10 मे रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा हे अभियान पुणे ग्रामीण पोलीस दलांमार्फत पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे. सदर अभियाना दरम्यान आतापर्यंत एकविरा मंदिर आणि कार्ला लेणी परिसर, लोहगड किल्ला इथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तरी वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा या अभियानादरम्यान दिनांक 10 मे रोजी सकाळी 6 वाजता टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलींग पॉईंट इथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून या अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,” असे आवाहन लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे. ( Cleanliness campaign in Tiger Point Lion Point area on 10th May under campaign Warsa Swachchate Mavla Shivarayancha )
अधिक वाचा –
– मावळमधील बेलज येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– 14 वर्षांनी पुन्हा भरली शाळा! शिवली येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा
– ‘डोंगरची काळी मैना’ बाजारात दाखल, आदिवासी बांधवांना नवा रोजगार । Kamshet News