शिवली येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयातील सन 2008-09 या वर्षातील इयत्ता दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अगोदर राष्ट्रगीतासह सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एक एक विद्यार्थी व्यासपीठावर जाऊन स्वतःचा परिचय करुन देत होता. यावेळी शिक्षक, व्यावसायिक, प्रगतशील शेतकरी आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले चेहेरे फार वर्षांनी एकत्र आले होते. विद्यार्थ्यांकडून यावेळी शिक्षकांचे सत्कार करून शाळेला व शिक्षकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
सन 2008-09 ला दहावीची परीक्षा देऊन बाहेर पडलेले हे सर्व सवंगडी, तब्बल 14 वर्षांनतर प्रथमच भेटत होते. त्यामुळे एक भावनिक आणि आनंदाचा असा हा सर्व प्रसंग होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. शाळेचे माजी विद्यार्थी अमित ठाकर, रविंद्र आडकर, अजय गायकवाड, शरद येवले, संपत आडकर, राजेंद्र आडकर, विनायक आडकर, नितीन आडकर, वैभव घारे, सुनील आडकर, विक्रम जाधव, उमेश आडकर, सिमा आडकर, शुभांगी आडकर, निलम शेडगे, योगिता येवले, स्वाती लोहोर यांनी शाळेत शिक्षण घेत असताना केलेल्या दंगा मस्तीच्या आठवणीना उजळा दिला.
विद्यार्थ्यांच्या हातून आई-वडिलांची आणि देशाची सेवा घडली पाहिजे, प्रत्येकाने उत्तोरोत्तर प्रगती करत राहिले पाहिजे, सर्वांच्या प्रयत्नातून शाळेला सहकार्यचा प्रतिसाद मिळावा, सर्वांनी सातत्याने भेटत राहावे, असे मार्गदर्शन यावेळी अमित विजय ठाकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय गायकवाड यांनी केले. तर प्रास्ताविक अमित ठाकर यांनी केले. आभार रविंद्र आडकर यांनी व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
(माहिती स्त्रोत – सचिन ठाकर)
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– ‘डोंगरची काळी मैना’ बाजारात दाखल, आदिवासी बांधवांना नवा रोजगार । Kamshet News
– मावळ तालुक्यातील वारू गावच्या भिमाताई लोंढे यांना संगीत विशारद पदवी प्रदान