डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे मावळ तालुक्यातील डोंगरदऱ्यात बहरून आल्याने आता बाजारात दाखल झाली आहे.
पूर्वी सर्रास दिसून येणारी करवंदांची जाळी आता फक्त डोंगरभागात दिसून येतात. त्यातही वृक्षतोड झाल्याने करवंदे गोळा करण्यासाठी डोंगराची चढण चढावीच लागते. अशात जंगलातील ही करवंदे तोडून बाजारात विक्रीसाठी आणून त्याद्वारे कुटुंबाला आर्थिक हातभार लागत असल्याने आदिवासी बांधवांसाठी ही रोजगाराची संधी बनली आहे. ( mountain black current karwand entered in market tribal comunity get new employment )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
करवंदे खाण्याचे अनेक फायदे –
करवंद हा रानमेवा ग्रामीण भागात बघायला मिळतो. पिकलेले करवंद दिसायला काळसर असतात. चवीला आंबट असणारे करवंद खाल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. करवंदामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. करवंदाचे सेवन केल्याने त्वचा विकार होत नाहीत. रक्ताची कमतरता असलेल्यांनी रोज करवंद खाल्याने रक्त वाढायला मदत मिळते. करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने करवंदाचे सेवन केल्याने बद्धकोष्टतेचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. करवंदामध्ये कॅल्शिअम हा पोषक घटक असल्याने करवंदाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. करवंदाचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील वारू गावच्या भिमाताई लोंढे यांना संगीत विशारद पदवी प्रदान
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी, अपघात रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, लगेच पाहा