लोणावळा ( Lonavala ) इथे अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला लोणावळा शहर पोलिसांनी ( City Police ) अटक केली आहे.
पीडित मुलीच्या आईने याबाबत लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद ( Crime News ) दिली होती. त्यानुसार आरोपी दीपक संजय सोनवणे (वय 28, रा. तुंगार्ली, लोणावळा) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध बलात्कार तसेच बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, आरोपी दीपक सोनवणे याने सदर अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून लोणावळा रेल्वे क्वार्टर भागात नेले. तिथे त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो मुलीला तिथेच सोडून पसार झाला. घाबरलेल्या मुलीने घटनेची माहिती आईला दिली.
पोलिसांनी तपास करून सोनवणेला अटक केली आहे. तसेच पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश बावकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ( man arrested for trying to sexually assaulting minor girl by lonavala city police )
अधिक वाचा –
– 14 वर्षांनी पुन्हा भरली शाळा! शिवली येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी, अपघात रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, लगेच पाहा