पुणे येथील एस डी फाऊंडेशन संस्थेचे संचालक साहिल राजेंद्र ढमाले यांना यंदाचा ‘धर्मवीर पुरस्कार 2023’ जाहीर झाला आहे. येत्या 13 मे 2023 रोजी कागल (कोल्हापूर) इथे होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा दरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
साहिल राजेंद्र ढमाले हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात. वेगवान वाहनांमुळे रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन देणे, गरिब परिस्थिती असणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून देणे, असे आजवर अनेक नागरिकांचा जीव वाचविण्याचे कार्य त्याने केले आहे.
तसेच वन्यजीव रक्षक मावळ व शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या संस्थेसोबत मिळून कायम बचाव कार्य करण्यात ते अग्रेसर असतात. यासह कोरोना काळात अनेकांना दिवस रात्र वैद्यकीय मदत देऊन त्यांनी अनेकांचे जीव वाचवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
अधिक वाचा –
– 14 वर्षांनी पुन्हा भरली शाळा! शिवली येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा
– ‘डोंगरची काळी मैना’ बाजारात दाखल, आदिवासी बांधवांना नवा रोजगार । Kamshet News