जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची मागील आठवड्यात शुक्रवारी (दिनांक 12 मे) तळेगाव नगरपरिषद समोर निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येने फक्त मावळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाही हादरला. किशोर आवारे हे जनसामान्यांसाठी झटणारे समाजसेवक म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यामुळेच त्यांना न्याय मिळावा आणि मारेकऱ्यांना कडक शासन व्हावे, या मागणीसाठी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते यांच्याकडून बुधवारी (दिनांक 17 मे) जाहीर मोर्चाची हाक देण्यात आली आहे. ( Kishor Aware Murder Case )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
किशोर आवारेंच्या हत्येची माहिती सर्वत्र पसरताच शुक्रवारी तळेगाव शहरात उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी तळेगाव पोलिसांत फिर्याद देताना आमदार सुनिल शेळकेंसह त्यांचे बंधू आणि इतर असे एकूण सात जणांचा उल्लेख केला. त्यामुळे आमदार शेळकेंवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि मावळ तालुक्यात पुन्हा खळबळ माजली. त्यानंतर शनिवारी (दिनांक 13 मे) तळेगाव दाभाडे पोलीस चौकीवर मोर्चा काढून पुन्हा एकदा पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवारे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा किशोरभाऊंना न्याय मिळावा, या मागणीसाठी समर्थकांनी बुधवारी जाहीर मोर्चाची हाक दिली आहे. ( public march of Kishor Aware supporters at talegaon dabhade on 17th May )
तळेगाव दाभाडे शहरातील मारुती मंदिर चौक इथे बुधवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 5 वाजता हा मोर्चा होणार आहे.
किशोर आवारे हत्या प्रकरणी पोलिस तपास कुठपर्यंत ?
किशोर आवारे यांच्या हत्येचा तपास करताना पिंपरी चिंचवड पोलिसांनी जलदगतीने चक्र फिरवली, पोलिसांनी अनेक पथके तयार केली. त्याद्वारे आतापर्यंत मुख्य सुत्रधारासह एकूण सहा आरोपींना गजाआड करण्यात आले असून त्यांना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक अर्थात एसआयटीची देखील स्थापना करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरण : 6 आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी विशेष पथक । Kishor Aware Murder Case
– ‘खरं हाती येईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं..’, आमदार शेळकेंसाठी नगराध्यक्ष मयूर ढोरेंची भावूक पोस्ट, वाचा सविस्तर