व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘किशोरभाऊंना न्याय मिळालाच पाहिजे..!’, समर्थकांकडून 17 मे रोजी जाहीर मोर्चाची हाक । Kishor Aware Murder Case

तळेगाव दाभाडे शहरातील मारुती मंदिर चौक इथे बुधवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 5 वाजता हा मोर्चा होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 16, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Kishor-Aware

Photo Courtesy : Dainik Maval Graphics Team


जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची मागील आठवड्यात शुक्रवारी (दिनांक 12 मे) तळेगाव नगरपरिषद समोर निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येने फक्त मावळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाही हादरला. किशोर आवारे हे जनसामान्यांसाठी झटणारे समाजसेवक म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यामुळेच त्यांना न्याय मिळावा आणि मारेकऱ्यांना कडक शासन व्हावे, या मागणीसाठी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते यांच्याकडून बुधवारी (दिनांक 17 मे) जाहीर मोर्चाची हाक देण्यात आली आहे. ( Kishor Aware Murder Case )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

किशोर आवारेंच्या हत्येची माहिती सर्वत्र पसरताच शुक्रवारी तळेगाव शहरात उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी तळेगाव पोलिसांत फिर्याद देताना आमदार सुनिल शेळकेंसह त्यांचे बंधू आणि इतर असे एकूण सात जणांचा उल्लेख केला. त्यामुळे आमदार शेळकेंवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि मावळ तालुक्यात पुन्हा खळबळ माजली. त्यानंतर शनिवारी (दिनांक 13 मे) तळेगाव दाभाडे पोलीस चौकीवर मोर्चा काढून पुन्हा एकदा पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवारे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा किशोरभाऊंना न्याय मिळावा, या मागणीसाठी समर्थकांनी बुधवारी जाहीर मोर्चाची हाक दिली आहे. ( public march of Kishor Aware supporters at talegaon dabhade on 17th May )

तळेगाव दाभाडे शहरातील मारुती मंदिर चौक इथे बुधवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 5 वाजता हा मोर्चा होणार आहे.

हेही वाचा – पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून आवारे कुटुंबीयांचे सांत्वन; दोषींवर कठोर कारवाईची कुटुंबीयांची मागणी । Kishor Aware Murder Case

किशोर आवारे हत्या प्रकरणी पोलिस तपास कुठपर्यंत ?

किशोर आवारे यांच्या हत्येचा तपास करताना पिंपरी चिंचवड पोलिसांनी जलदगतीने चक्र फिरवली, पोलिसांनी अनेक पथके तयार केली. त्याद्वारे आतापर्यंत मुख्य सुत्रधारासह एकूण सहा आरोपींना गजाआड करण्यात आले असून त्यांना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक अर्थात एसआयटीची देखील स्थापना करण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरण : 6 आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी विशेष पथक । Kishor Aware Murder Case
– ‘खरं हाती येईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं..’, आमदार शेळकेंसाठी नगराध्यक्ष मयूर ढोरेंची भावूक पोस्ट, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी ‘यांची’ वर्णी

Next Post

वन्यजीव रक्षक मावळच्या प्राणीमित्रांकडून रानमांजराला जीवदान । Navalakh Umbare

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
life-save-wild-cat

वन्यजीव रक्षक मावळच्या प्राणीमित्रांकडून रानमांजराला जीवदान । Navalakh Umbare

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.