मावळ तालुक्यातील पवनमावळ भागात असलेल्या शिळींब गावात आज (2 ऑक्टोबर, रविवार) रोजी झालेल्या प्रकाराची सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे. रविवारी 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 153वी जयंती होती. तसेच, भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती होती. मात्र, रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने असेल किंवा इतर काही कारणामुळे परंतू शिळींब गावातील शाळा, बालवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालय इथे पुर्णतः गांधी जयंतीचा विसर पडल्याचे दिसून आले. ( Mahatma Gandhi Birth Anniversary Celebrated Outside Closed Office Of Shilimb Village Gram Panchayat )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अगदी सकाळचे 11 वाजून गेले तरीही या सर्व ठिकाणी महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्ताने कोणताही छोटा मोठा कार्यक्रम होणार असे नियोजनच दिसून आले नाही. वास्तवात स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना महात्मा गांधीजींची जयंती देखील तितक्यात जोशात आणि दणक्यात भलेही रविवार असला तरीही साजरी होणे आवश्यक होते. मात्र, ग्रामपंचायतसह शाळा, बालवाडी या ठिकाणी देखील गांधी जयंतीचा विसर पडल्याचेच दिसून आले.
परंतू गावातील तरुणांना हे काही रुचले नाही. त्या सर्वांनी एकत्र येत महात्मा गांधीजींची जयंती साजरी करण्याचे ठरवले. पंरतू, फोटोची अडचण होती. कारण शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंद होते. अशात मुलांनी महात्ना गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांचे फोटो प्रिंट करुन त्यांना फ्रेम केले. त्यानंतर सर्वांनी ग्रामपंचायतीच्या बंद कार्यालयासमोर येऊन महात्मा गांधीजींची आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांची जयंती साजरी केली.
हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा विसर पडलेल्या सरकारी सेवक, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यासह शाळेतील शिक्षक यांना देखील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाब विचारावा किंवा त्यांवर काही कारवाई व्हावी अशी मागणी तरुणांनी केली आहे. ( Mahatma Gandhi Birth Anniversary Celebrated Outside Closed Office Of Shilimb Village Gram Panchayat )
अधिक वाचा –
वेट अँड जॉय वॉटर पार्क व्यवस्थापनाचा तुघलकी निर्णय, कामगारांचा कंपनीबाहेर ठिय्या, 300 कुटुंबाचे भवितव्य दावणीला
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिवाचे रान करणारे शिक्षक संजय ओव्हाळ यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित
दसरा मेळाव्याला जायचंच..! मावळ तालुक्यातून ‘सावळा’ गावचा ‘मावळा’ पायीच निघाला शिवतीर्थावर