मावळ तालुका हा डोंगर दऱ्यांचा आणि घनदाट अरण्याचा भाग. इथे बिबट्यासह अनेक जंगली श्वापदे आहेत. पूर्वी रेस्क्यू वाहन जवळपास नसल्याने अनेक वन्यजीवांचा उपचाराअभावी किंवा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. परंतू आता मावळ तालुक्यात वनविभागाला रेस्क्यू व्हॅन मिळाली आहे. ( Forest Office Shirota Vadgaon Maval Has First Time Get An Independent Rescue Van )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रेस्क्यू व्हॅन कार्यालयासमोर दाखल होताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. या अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅनमध्ये रेस्क्यूसाठी लागणारे सर्व साहित्य आणि स्वयंचलित पिंजरा आहे. ही व्हॅन उपलब्ध झाल्यावे मावळच्या कोणत्याही भागात वन्यजीवांना रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवणे सोपे जाणार असल्याचे शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशिल मंतावार यांनी सांगितले. ( Forest Office Shirota Vadgaon Maval Has First Time Get An Independent Rescue Van )
अधिक वाचा –
– पवनमावळात एसआरटी तंत्रज्ञान रुजवणारे कृषी सहाय्यक विकास गोसावी यांना ‘स्टार प्रचारक अधिकारी’ पुरस्कार
– ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियान : तळेगाव नगरपरिषदेमार्फत शहरात दोन ‘आरआरआर’ केंद्र