केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय दिल्ली यांच्या वतीने ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियान अंतर्गत प्रत्येक स्थानिक संस्थांना रिड्यूस, रीयूज, रिसायकल सेंटर्स म्हणजेच आरआरआर केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत दोन आरआरआर केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार तळेगाव दाभाडे शहरामध्ये नगरपरिषद कार्यालय आणि घनकचराव्यवस्थापन केंद्र, मोरखळा अशा दोन ठिकाणी आरआरआर केंद्र दिनांक 20 मे पासून सुरू केली आहेत. ( my life my clean city campaign two RRR centers in talegaon dabhade through nagarparishad )
आरआरआर सेन्टर्स चे उद्घाटन मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कार्यालयीन अधीक्षक तसेच आवक जावक प्रमुख रविंद्र काळोखे, स्वच्छता निरिक्षक मयूर मिसाळ तुकाराम मोरमारे, प्रमोद फुले, शहर समन्वयक गीतांजली होनमने, रोहित भोसले, सुजाता घोडेकर तसेच इतर नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा – किशोर आवारे हत्या प्रकरणातील एसआयटी प्रमुख प्रेरणा कट्टे यांची बदली रद्द, नेमके काय घडले? वाचा
शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे, लहान मुलांची खेळणी आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी रिड्यूस, रियूज, रिसायकल, केंद्र स्थापन करणे, तसेच या संकलित वस्तूंचे नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करून विविध भागधारकांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. या उपक्रमामुळे तळेगाव दाभाडे शहर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.
त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांनी वापरलेलीजुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे, लहानमुलांची खेळणी आणि इतर निरुपयोगी वस्तू या “आरआरआर” केंद्रावर सुपूर्द करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– पालखी सोहळ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी; पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्यावर विशेष भर
– धक्कादायक! कामशेत ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी तरुणीचा मृत्यू