‘आमदार सुनिल शेळके यांच्यावर किशोर आवारे हत्या प्रकरणी झालेले आरोप आणि त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा यातून त्यांची सुटका व्हावी, आणि त्यांच्यावरील अरिष्ट टळावे’ यासाठी आमदार शेळके यांच्या समर्थकांकडून तालुक्यातील अनेक गावात ग्रामदैवतांना अभिषेक केले जात आहेत.
रविवारी (दिनांक 28 मे) मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मावळचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री पोटोबा महाराज माता जोगेश्वरी यांना महाअभिषेक करण्यात आला. तसेच मंदिरास प्रदक्षिणा घालून श्री पोटोबा महाराजांना साकडे घालण्यात आले. ( Maha Abhishek for Maval MLA Sunil Shelke at Potoba Maharaj Temple in Vadgaon )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मा तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाषराव जाधव, मा उपसरपंच तुकाराम ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, मा उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, शिंदे गुरूज, मोरया प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, मायाताई चव्हाण, राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष शांताराम कुडे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन ढोरे, युवक अध्यक्ष अतुल वायकर, सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण ढोरे, नितिन भांबळ, सुरेश कुडे;
पुजारी सुरेश गुरव, प्रज्योत पेटकर, नितीन चव्हाण, राष्ट्रवादी अल्प संख्याक सेल अध्यक्ष मजहर सय्यद, सचिन कडू, सिद्धेश ढोरे, समीर दौंडे, मयूर गुरव, गौतम सोनवणे आदींसह वडगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका, सभासद वडगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– अजित करवंदे आणि सावरी सातकर ठरले मावळ चषक कुस्ती स्पर्धेचे मानकरी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
– तळेगाव शहरात भाजपाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140वी जयंती उत्साहात साजरी । Savarkar Jayanti 2023