व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील आश्रम शाळेत अल्पवयीन मुलांवर अत्याचार, आरोपी शिक्षकाला अटक ; नीलम गोऱ्हे यांच्याकडून घटनेची गंभीर दखल

मावळ तालुक्यातील एका निवासी आश्रम शाळेत दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 26, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील एका निवासी आश्रम शाळेत दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणाची तत्काळ दखल घेत, सदर अत्याचाराची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

प्रकरणातील आरोपी हा कंत्राटी शिक्षक असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. आरोपीने त्याने दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

  • ही बाब अतिशय निंदनीय असून हलाखीची परिस्थिती असल्यामुळे शैक्षणिक कारणास्तव निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलांची सुरक्षा धोक्यात असल्याचे यातून उघड झाले आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसंदर्भात कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

सदर बाल लैंगिक अत्याचाराबाबत सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर पॉक्सो इत्यादी प्रचलित तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात यावी. सोबत प्रकरणातील अल्पवयीन मुलांचे संरक्षण व समुपदेशन योग्य पद्धतीने करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

तसेच, राज्यातील निवासी आश्रम शाळांमध्ये गुड टच बॅड टच बाबत मुलांना माहिती दिली जात असल्याची खातरजमा करावी. राज्यातील निवासी आश्रम शाळांमधील बाल लैंगिक अत्याचार विषयक घटना टाळण्यासाठी जिल्हानिहाय बाल कल्याण समित्या गठीत करण्यात आल्या असल्याबाबत खातरजमा करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी


Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक कर्मचाऱ्यांची उपासमार । Talegaon Dabhade News

Next Post

मुंबई ते पुणे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार, सह्याद्रीच्या डोंगररांगेतून जाणारा रस्ता अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mumbai Pune missing link project

मुंबई ते पुणे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार, सह्याद्रीच्या डोंगररांगेतून जाणारा रस्ता अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.