मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ( Accident on Mumbai Pune Expressway ) किलोमीटर 39.800 च्या दरम्यान एक विचित्र अपघात झाला. मुंबई लेनवर सोमवारी ( 12 सप्टेंबर ) एकूण नऊ गाड्यांचा अपघात झाला. खोपोली शहराच्या हद्दीत हा अपघात झाला.
एका ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने त्याने समोर असलेल्या कारला धडक दिली. यानंतर समोरील कारने पुढच्या वाहनाला धडक दिली, असे करत करत एकूण 9 वाहनांचा अपघात झाला. ( Nine Cars Collided With Each Other ) ट्रक ( क्रमांक MH 46 AF 9160) याचा ब्रेक निकामी झाल्याने त्याने समोर असलेल्या कारला जोरदार धडक दिली. त्याच वेगात समोरच्या कारने तिसऱ्या वाहनाला धडक दिली. हा प्रकार एकूण नऊ वाहनांच्या धडकेपर्यंत सुरु राहिला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातात आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स यांनी मदत केली. बोरघाट वाहतूक पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन वाहतूक सुरळीत केली.अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला, त्यामुळे खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताची चौकशी सुरु आहे. ( Accident on Mumbai Pune Expressway Nine Cars Collided With Each Other )
अपघातग्रस्त वाहने;
व्हॅगनर कार – MH 12 TV7907
व्हॅगनर कार – MH 14 EC 2767
हुंदाई कार – MH 14 HG 5092
हुंदाई कार – MH 04 HN 0429
स्विफ्ट कार – MH 46 AP 0616
कार – MH 12 LD 2055
कार – MH 47 AU 2737
एसटी बस – MH 14 BT 4698
ट्रक – MH 46 AF 9160
अधिक वाचा –
मोठी चोरी! शिवसेना मावळ तालुका उपप्रमुखाच्या घरी चोरट्यांचा डल्ला; रोख रकमेसह दागिने लंपास
चिमुकल्या आदित्यचा खून, संपूर्ण प्रकरण मन सुन्न करणारं, पैसा इतका मोलाचा असतो?