Dainik Maval News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लोणावळा शहरातील एका 26 वर्षीय तरुणास पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत एकूण नऊ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२१ साली घडली होती. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम ८, १२ आणि ९ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा रजिस्टर नंबर १०५/२०२१ असून, सदर प्रकरणाचा सत्र न्यायालयात (सेशन केस नंबर २७२/२०२२) तपास पार पडला.
आरोपी दीपक सुधीर मंडल (वय 26, रा. हातीगड, जि. नागाव, आसाम. सध्या राहणार साधना माल, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) याला न्यायालयाने दोषी ठरवले. मा. न्यायालयीन अधिकारी डी. के. अनभुले यांच्या न्यायालयात खटला चालविण्यात आला.
सरकारतर्फे अॅड. अगरवाल यांनी युक्तिवाद केला. पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे प्रभारी अधिकारी होते. प्रकरणाचा तपास म. पो. उपनिरीक्षक सुरेखा शिंदे (सध्या सेवा – सोलापूर ग्रामीण) यांनी केला. कोर्टामध्ये पोलीस हवालदार एस. व्ही. माने यांनी अंमलदारी केली, तर कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून पोसई खरात आणि जिल्हा पातळीवर पेरवी अधिकारी म्हणून पो. नि. संतोष घोळवे यांनी भूमिका पार पाडली.
न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम ३५४ अन्वये ५ वर्षांची शिक्षा आणि १,००० रुपये दंड, पोक्सो कलम १२ अन्वये ३ वर्षांची शिक्षा आणि १,००० रुपये दंड, तर कलम ९(क) अन्वये ५ वर्षांची शिक्षा व १,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सीआरपीसी २३५ (२) नुसार आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली.
अधिक वाचा –
– वाळू, खडी, मुरुम, दगड आदी बांधकाम साहित्य वापरताना गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक । Pune News
– पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, ‘असा’ करा अर्ज । Pune News
– पवना धरणात अवघा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक ! 30 जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी, नागरिकांनी पाणी जपून वापरावे । Pavana Dam
– राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मावळ तालुक्यातील खेळाडूंना घवघवीत यश । Lonavala News