Lonavala Bhushi Dam News : भुशी धरण येथे रविवारी झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत भुशी धरण परिसरातील मध्य रेल्वेच्या जागेतील दुकानांवर, टपऱ्यांवर कारवाई करत सर्व दुकाने जमीनदोस्त केली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईने स्थानिक व्यावसायिक प्रचंड संतप्त झाले आहेत. कोणतीही माहिती किंवा सूचना न देता ही कारवाई झाल्याचा येथील व्यावसायिकांचा आरोप आहे. त्यामुळे या गरीब व्यावसायिकांवर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 3) आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुढील दोन दिवसात काढलेली दुकाने पुन्हा उभी करू दिली नाही तर त्यानंतर लोणावळा बंद करण्याचा तसेच रास्तारोको आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. यावेळी सर्व पक्षीय लोणावळेकर जागृत नागरिकांच्या वतीने बुधवारी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कारवाईचा आणि रेल्वे प्रशासन तसेच नगरपरिषद प्रशासनाचा निषेध करण्यात आला. संतप्त झालेल्या अनेक व्यावसायिकांनी यावेळी त्यांच्या भावना मांडल्या. ( Action against Lonavala Bhushi Dam encroachment Agitation by local businessmen )
लोणावळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस आय पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कष्टकरी कामगार पंचायत, टॅक्सी संघटना आदी संघटनाचे पदाधिकारी व कारवाई झालेले दुकानदार व त्यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी व लोणावळा शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आंदोलन स्थळी येत लोणावळाकर जागरूक नागरिक व व्यवसायिक यांचे निवेदन स्वीकारल्या नंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
अधिक वाचा –
– खडकाळे सोसायटीच्या चेअरमनपदी सोपान काटकर यांची बिनविरोध निवड । Maval News
– स्तुत्य उपक्रम ! नवयुग सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना ‘मदतीचा हात’ । Maval News
– पीडीसीसी बँकेकडून मावळ तालुक्यातील 11 शाळांना शैक्षणिक मदत; ‘या’ विद्यालयांना शालेय साहित्यांसाठी धनादेशांचे वाटप