कल्याणमधील ‘सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर’ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 22 युवकांच्या ग्रुपने महाराष्ट्राच्या गिर्यारोहणातील वजीर समजला जाणारा ‘वजीर सुळका’ सर केला. ज्यात मावळ तालुक्यातील शिवली गावातील युवक आदेश सुरेश आडकर याचाही समावेश होता. दिनांक 22 जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली. प्रभू श्रीराम यांचे स्वागत निसर्गाच्या सानिध्यात करण्यासाठी ह्या 22 जणांच्या चमूने वजीर सुळक्याची निवड केली आणि मिनी एव्हरेस्ट समजला जाणारा हा वजीर सुळका सर केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वजीर सुळक्याच्या माथ्यावर प्रभू श्री राम यांचा भगवा ध्वज फडकवत या मावळ्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत संपूर्ण आसमंत दणाणून सोडला. ‘प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा दिनाचे औचित्य साधून अवघड अशा वजीर सुळक्यावर भगवा ध्वज फडकावणे हा माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण होता’, असे आदेश आडकर याने दैनिक मावळशी बोलताना सांगितले. आदेशने याअगोदर भैरवगड, जीवधन गड, तैलबैल सारख्या ठिकाणी चढाई केलेली आहे. ( adesh adkar from shivli village maval successfully climbed vajir pinnacle )
सुळक्यांचा वजीर – वजीर सुळका
ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला आहे. याच परिसरात असलेला 250 फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी कात्बाव (चाफ्याचा पाडा) गावातून तीन तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजून खोल दरी, पाठीवर ओझे, यातून जराजारी पाऊल घसरले तर त्या व्यक्तीला दरीच्या जबड्यात विश्रांती मिळते, अशी चर्चा आहे.
पाण्याची प्रचंड कमतरता आणि त्यानंतर वजीर सुळक्याची 250 फुटांची 90 अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते. शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून या वजीर मोहिमेकडे पहिले जाते. तरीही महाराष्ट्राच्या गिर्यारोहणातील वजीर असलेला हा वजीर सुळका सर करण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द, चिकाटी आणि साहस याच्या जोरावर अनेक युवक हा सुळक सर करतात.
अधिक वाचा –
– छत्रपती शिवरायांना मुजरा अन् जरांगे पाटलांना धन्यवाद! मावळातील युवकाने दिलेल्या जगावेगळ्या शुभेच्छांची राज्यभर चर्चा
– खासदार श्रीरंग बारणेंकडून पवन मावळ दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण; सोमाटणेत बारणेंचा नागरी सत्कार
– मावळमधील महाविकासआघाडीच्या नेत्यांचा वडगावातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला विरोध; गण निहाय अभियान राबवण्याची मागणी