महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणात घेण्यात यावा, अशी मागणी मावळ तालुका महाविकासआघाडीच्या वतीने तहसीलदार मावळ यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महाविकासआघाडीच्या वतीने काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंतराव मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख आशिष ठोंबरे यांनी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांच्याकडे दिले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तालुक्यातील शेवटच्या टोकातील व्यक्तीला या अभियानाचा लाभ व्हावा, नागरिकांचा प्रवास खर्च वाचावा, असा महाविकासआघाडीच्या निवेदनामागील हेतू असल्याचे नमूद केले आहे. ‘येत्या 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत वडगावमधील भेगडे लॉन्स येथे शासन आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात येत आहे. त्यावेळी कार्यक्रमापासून लांब असलेल्या गावातील नागरिकांना तिथे पोहोचणे अडचणीचे ठरणार आहे. तसेच प्रवासाचा खर्च आणि वृद्धांना होणारा संभाव्य त्रास लक्षात घेता महाविकासआघाडीचे यशवंतराव मोहोळ, दत्तात्रय पडवळ आणि आशिष ठोंबरे यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे’, असेही निवेदनात नमूद आहे. ( Mahavikas Aghadi leaders opposed shasan aplya dari program to be held at bhegde lawns vadgaon )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्याचा नवा विक्रम! चालू वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्ज वाटप, पाहा आकडेवारी । Pune News
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मनोज जरांगे पाटील यांना आता 24 तास सुरक्षा, शस्त्रधारी पोलीस तैनात । Manoj Jarange Patil
– मोठी बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, अप आणि डाऊनच्या अनेक लोकल फेऱ्या रद्द, पाहा संपूर्ण यादी । Block on Pune Lonavala Railway Route