पुणे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मावळ तालुक्यातील एकूण 11 साकव पुलांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या साकव पुलांसाठी निधी उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होईल, असे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीमार्फत एकूण 11 साकव पुलांसाठी तब्बल 5 कोटी 21 लाख 33 हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत लेखाशिर्ष साकव बांधकाम सण 2023-2024 अंतर्गत मावळ तालुक्यातील 8 साकव पुलांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या योजनेत एकूण 3 कोटी 70 लाख 90 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मंजूर साकव पूल आणि निधी यांची माहिती खालीलप्रमाणे,
- कुसगाव बु.येथे वार्ड क्र. 6 मधील दत्तवाडी ते कुसगाव रस्त्यावर पुल बांधणे – 96.33 लाख
- ताजे – पिंपळोली रस्त्यावर साकव बांधणे – 35.83 लाख
- पाटण येथे ओढ्यावर साकव बांधणे – 31.21 लाख
- भाजे येथे मानकर – गोणते वस्ती रस्त्यावर साकव बांधणे – 35.54 लाख
- साते येथे भुंडेवस्ती रस्त्यावर साकव बांधणे – 34.99 लाख
- कशाळ येथे गव्हाणे वस्ती रस्त्यावरील कामथ ओढ्यावर साकव बांधणे – 42.00 लाख
- महागाव येथे सावंत वस्ती – लायगुडे वस्ती रस्त्यावर साकव बांधणे – 35.00 लाख
- परंदवडी – धामणे – गोडूंब्रे – रस्त्यावर साकव बांधणे – 60.00 लाख
पुणे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत लेखाशिर्ष अनुसूचित जाती घटक कार्यक्रम/आदिवासी उपाययोजना सन 2023-2024 अंतर्गत मावळ तालुक्यातील 3 साकव पुलांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या योजनेअंतर्गत एकूण 1 कोटी 50 लाख 43 हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे. मंजूर साकव पूल आणि निधी यांची माहिती खालीलप्रमाणे,
- मौजे अजिवली येथे गावठाण ते दलितवस्ती रस्त्यावर साकव पुल बांधणे – 55.43 लाख
- मौजे सांगवडे येथे नेरे रस्त्यावर दलितवस्ती येथे साकव पुल बांधणे – 60.00 लाख
- मौजे कुसवली येथे कडूबाई मंदिराजवळ साकव बांधणे – 35.00 लाख
अधिक वाचा –
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मनोज जरांगे पाटील यांना आता 24 तास सुरक्षा, शस्त्रधारी पोलीस तैनात । Manoj Jarange Patil
– मोठी बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, अप आणि डाऊनच्या अनेक लोकल फेऱ्या रद्द, पाहा संपूर्ण यादी । Block on Pune Lonavala Railway Route
– स्वारगेट डेपोची चावसर गाव मुक्कामी एसटी बस पुन्हा सुरु करण्याची मागणी