मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत. त्यासाठी त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानुसार 2 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी 24 तास 2 शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जरांगे यांना सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी 24 तास हे शस्त्रधारी पोलीस तैनात असणार आहेत. ( Maratha Reservation Movement 24 Hours Security to Manoj Jarange Patil from Maharashtra Govt )
राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने मनोज जरांगे यांना पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी 24 तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, त्याआधी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हे कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत.
अधिक वाचा –
– समाज कार्यात अग्रेसर असलेल्या एकता प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते प्रकाशन
– शिवजयंती जल्लोषात साजरी होणार! प्रशासनाची जोरदार तयारी, जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश । Shiv Jayanti 2024
– माजी उपपंतप्रधान, प्रखर हिंदुत्ववादी नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन । Bharat Ratna to Lal Krishna Advani