Bharat Ratna to Lal Krishna Advani : भारताचे माजी उपपंतप्रधान, तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय राजकारणाच्या इतिहासात प्रखर हिंदुत्ववादी नेते अशी ओळख असलेले लालकृष्ण आडवाणी यांना यंदाचा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक्सद्वारे (ट्विट करून) ही माहिती दिली आहे, तसेच आपण लालकृष्ण आडवाणी यांचे याबाबत अभिनंदन केले असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पंडीत नेहरू, डॉ, राजेंद्र प्रसाद, लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, अटलबिहारी वाजपेयी अशा अनेक राजकारण्यांना आजवर हा पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या राजकीय परंपरेत अतुलनीय योगदान देणाऱ्या अनेक दिग्गज राजकीय व्यक्तिमत्वांना आजवर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर आता हा पुरस्कार भाजपाचे वरीष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देण्यात येणार आहे. आडवाणी हे सध्या सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. Lal Krishna Advani To Be Honoured With Bharat Ratna Announces PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘एक्स’वर पोस्ट (ट्विट) –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी लिहिलंय की, ‘मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला असून या सन्मानाने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचे भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. ग्राऊंड लेव्हलवरून त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात करून उपपंतप्रधान पदी विराजमान होऊन देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचा प्रवास होता. गृहमंत्री आणि सूचना आणि प्रसारण मंत्री रुपानेही त्यांनी त्यांची प्रतिमा तयार केली. त्यांचा संसदेतील सहभाग नेहमीच अनुकरणीय आणि समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहे.’
I am very happy to share that Shri LK Advani Ji will be conferred the Bharat Ratna. I also spoke to him and congratulated him on being conferred this honour. One of the most respected statesmen of our times, his contribution to the development of India is monumental. His is a… pic.twitter.com/Ya78qjJbPK
— Narendra Modi (@narendramodi) February 3, 2024
लालकृष्ण आडवाणी यांनी 2002 ते 2004 या दरम्यान भारताचे 7 वे उपपंतप्रधान म्हणून काम केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत त्यांनी 60 वर्षे राजकीय स्तरावर काम केले. आडवाणी भाजपाचे संस्थापक सदस्य असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. आडवाणी हे सर्वाधिक काळ गृहमंत्री आणि लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते राहिले आहेत. भाजपाचे 2009 च्या निवडणूकीत आडवाणी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. 90 च्या दशकात रथयात्रेद्वारे राममंदिरासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभारले होते, तसेच राममंदिर निर्माण कार्यात इतिहासात त्यांचे योगदान मोठे आहे. देशस्तरावर एक प्रखर हिंदुत्ववादी नेते अशी त्यांची कार्यकाळात ओळख होती. ते आता 96 वर्षांचे असून सध्या सक्रीय राजकारणापासूनअलिप्त आहेत.
अधिक वाचा –
– महत्वाचे! मावळ तालुक्यात सोमवारपासून ‘शासन आपल्या दारी’ अभियान, प्रत्येक गाव आणि शहरासाठी दिवस राखीव, वाचा अधिक
– मोठी बातमी! आमदार सुनिल शेळकेंचे पक्षातील वजन वाढले, अजितदादांकडून शेळकेंना थेट राज्यस्तरीय जबाबदारी, लगेच वाचा । MLA Sunil Shelke
– वडगाव शहरात लहान मुलामुलींसाठी मल्लखांब प्रशिक्षण वर्गाची सुरूवात । Vadgaon Maval