शुक्रवारी (दिनांक 2 फेब्रुवारी) पुणे जिल्हा आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विधानभवन येथे श्री क्षेत्र भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, विश्वस्त गजानन शेलार, दिलीप ढोरे, मंदिर आर्किटेकट सोनपुरा आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे ;
श्री क्षेत्र भंडारा डोंगर तीर्थ क्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करा. आपण सर्वे मिळून अप्रतिम काम इथे करू.
तीर्थक्षेत्राचा विकास करताना भाविकांना व स्थानिक नागरिकांना दर्जेदार व पायाभूत सुविधा मिळाव्यात, याची खात्री करा.
मावळ / खेड कृषी व महसूल विभागाच्या ताब्यात असलेली गायरान जागे संदर्भात बैठक घ्यावी.
परिक्रमा मार्गावर असणाऱ्या वनविभागाच्या जागे संदर्भात प्रस्ताव सादर करावा.
मुख्य मंदिर, रस्ते, पाणी पुरवठा या पायाभूत सुविधांची पहिल्या टप्प्यात कामे सुरू करावी.
(review meeting for bhandara dongar development in presence of saurabh rao and rajesh deshmukh pune news)
अधिक वाचा –
– मोठी बातमी! आमदार सुनिल शेळकेंचे पक्षातील वजन वाढले, अजितदादांकडून शेळकेंना थेट राज्यस्तरीय जबाबदारी, लगेच वाचा । MLA Sunil Shelke
– वडगाव शहरात लहान मुलामुलींसाठी मल्लखांब प्रशिक्षण वर्गाची सुरूवात । Vadgaon Maval
– कामशेत – पवनानगर मार्गावर गंभीर जखमी आणि मृतावस्थेत आढळले तरस, अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज । Maval News