मोरया प्रतिष्ठान, रमेश कुमार सहानी स्कूल आणि इंद्रायणी स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव मावळ (Vadgaon Maval) शहरातील लहान मुलांसाठी अल्पदरात मल्लखांब (Mallakhamba) रोप मल्लखांब, योगासने आदींचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. श्री रमेश कुमार सहानी स्कूलच्या मैदानावर दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत 14 वर्षांखालील मुलामुलींना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गुरुवारी (दि. 1) या प्रशिक्षण सत्राचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तज्ञ प्रशिक्षकांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने इथे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मल्लखांब या मैदानी खेळाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे शारिरिक ताकद, लवचिकता, गती, एकाग्रता, उंची वाढवण्यासाठी ह्याचा फायदा होतो. तसेच मुलामुलींच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मल्लखांब उपयोगी आहे. ‘वडगाव शहरातील अधिकाधिक पालकांनी आपापल्या मुलांच्या शारिरीक तंदुरुस्तीसाठी त्यांना या प्रशिक्षणात सहभागी करावे,’ असे आवाहन मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी केले.
मल्लखांब प्रशिक्षण सत्राच्या शुभारंभावेळी वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, श्री रमेशकुमार सहानी स्कूलचे संस्थापक राजेंद्र म्हाळसकर, राजेंद्र वहिले, नंदकुमार म्हाळसकर, अर्जुन ढोरे, सचिन ढोरे, गणेश जाधव, माजी नगरसेविका पुनम जाधव, चेतना ढोरे, इंद्रायणी अकादमीचे सचिन शिंदे आणि पालक, विद्यार्थी उपस्थित होते. ( Mallakhamba Training Class For Children In Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’, जाणून घ्या । Balasaheb Thackeray Arogya Ratna Award
– ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत तळेगाव दाभाडे शहरात ‘शेतकरी आठवडी बाजार’ सुरु, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Talegaon Dabhade
– दीडशे शेळ्या-मेंढ्या दगावलेल्या ‘त्या’ गरीब मेंढपाळाला मावळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात! Maval News