राज्यातील माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्रजनन व बाल आरोग्य विषयी सेवा अधिक प्रभावीपणे देणे, कुटुंब कल्याण उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या घटकांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार (Balasaheb Thackeray Arogya Ratna Award) देण्यात येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सन 2023-24 या वर्षापासून एक नवीन आरोग्य पुरस्कार राज्यात सुरू झालेला आहे. हा पुरस्कार उत्कृष्ट काम करणारी स्वयंसेवी संस्था, उत्कृष्ट काम करणारे डॉक्टर, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार व कर्मचारी यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णयही निर्गमीत करण्यात आलेला आहे. ( Maharashtra Govt Announced Balasaheb Thackeray Arogya Ratna Award For Outstanding Work In Health Field )
आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला, उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन डॉक्टरांना, उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला व 5 कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रूपये असणार आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दरवर्षी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आयोजित करण्यात येईल. सन 2023-24 या वर्षात डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार नाही, असे शासन निर्णयात नमूद आहे.
अधिक वाचा –
– ‘सरकार झोपलंय..त्यांना जागं करण्यासाठी घंटानाद’, राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा, नागरी समस्यांची लांबलचक यादी प्रशासनाला सुपूर्द
– मावळ तालुका भाजपाची विद्यार्थी आघाडी आणि ओबीसी आघाडीची जम्बो कार्यकारिणी जाहीर, पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान । Vadgaon Maval
– गॅस सिलिंडरची अवैधरित्या वाहतूक, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांची खैर नाही! अन्नधान्य वितरण विभागाची मोठी कारवाई । Pune Crime