अन्नधान्य वितरण कार्यालयाच्यावतीने बुधवारी (दि. 31) मोरे वस्ती, चिखली, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे छापा टाकून मामा गॅस सर्विस एजन्सीविरुद्ध गॅस सिलिंडरची अवैधरित्या साठवणूक, वाहतूक या अनुषंगाने मोठी कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत 35 लाख 73 हजार 545 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी ही माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदर कारवाईमध्ये 4 मोठी वाहने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस भरलेले 105 सिलेंडर आणि रिकामे 602 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत आरोपी भिकचंद हिरालाल कात्रे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ( action by foodgrain distribution department in case of illegal transportation sale and storage of gas cylinders pune crime )
कात्रे यांच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 285, 286 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 नुसार तसेच एलपीजी (पुरवठा व वितरण आदेश) आदेश 2000 चे कलम 3 ते 7 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई परिमंडळ अधिकारी सचिन काळे, पुरवठा निरीक्षक श्रीमती स्नेहल गायकवाड, अमोल हाडे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे आदींनी केली आहे, असेही गिते यांनी सांगितले आहे.
अधिक वाचा –
– आनंदवार्ता! अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2109 कोटी रुपये निधी वितरणास राज्य सरकारची मान्यता
– महत्वाचे! मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ । Survey Of Maratha Community
– ‘दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते, विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव केल्यास यश सहज साध्य करता येईल’ – पंतप्रधान