शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील (ता. मावळ) मौजे पुसाणे गावच्या हददीत एका ओढ्याच्या कडेला मोकळ्या जागेत अवैधरित्या गावठी दारू बनवण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिरगांव परंदवडी पोलीस स्टेशनचे योगेश जालिंदर नागरगोजे (वय 36) यांनी याबद्दल फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी मित्तल देव राठोड (वय 21 वर्षे) आणि देव राठोड (वय अंदाजे 22 वर्षे) दोघेही रा. पुसाणे कंजार वस्ती (ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (क)(फ) आणि 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Shirgaon police raided factory illegally manufacturing Gavathi liquor in Pusane village limits )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारला असता दोन्ही आरोपींनी बेकायदेशिरपणे हातभट्टीची दारु तयार करण्याकरीता लावलेले गुळ मिश्रित कच्चे रसायण अंदाजे किंमत 1 लाख 98 हजार रुपये किंमतीचे साहित्यसह मिळून आले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी आडोशाचा फायदा घेऊन तिथून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार धायगुडे हे करत आहेत.
अधिक वाचा –
– महत्वाचे! मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ । Survey Of Maratha Community
– ‘दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते, विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव केल्यास यश सहज साध्य करता येईल’ – पंतप्रधान
– मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणूक : 19 जागांसाठी 94 उमेदवार इच्छुक, छाननीअंती 90 अर्ज वैध, वाचा सविस्तर