राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मावळ विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रालयात गुरुवारी (दि. 1 फेब्रुवारी) बैठक संपन्न झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके तसेच वित्त व नियोजन विभाग, सा.बां विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदर बैठकीत मावळातील विकासकामे, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाही यावर सविस्तर चर्चा झाली;
1. आई एकविरा देवी मंदिर परिसर विकास आराखडा व रोप-वे उभारणे कामास गती देण्यासाठी वन विभाग व पुरातत्व विभागाच्या संपूर्ण परवानग्या (NOC) दोन महिन्याच्या आत घेण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
2. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी कार्ला ते देहूरोड दरम्यान आवश्यक असलेल्या आठ ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला MSRDC च्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
3. जांभूळ येथे क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर केलेला असून तालुकास्तरीय अद्ययावत क्रिडा संकुल उभारण्यासाठी तात्काळ मान्यता द्यावी.
4. ग्लास स्कायवॉक प्रकल्पाचा संपूर्ण विकास आराखडा राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
‘उपमुख्यमंत्री अजितदादांनी प्रकल्पांना गती देण्याच्या सुचना बैठकीत दिल्याने मावळच्या सर्वांगीण विकासाच्या दूरदृष्टीतून या महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामांचा वेग वाढणार आहे.’ – आमदार सुनिल शेळके ( meeting held in ministry to speed up projects in maval vishansabha constituency in presence of dcm ait pawar )
अधिक वाचा –
– ‘दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते, विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव केल्यास यश सहज साध्य करता येईल’ – पंतप्रधान
– मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणूक : 19 जागांसाठी 94 उमेदवार इच्छुक, छाननीअंती 90 अर्ज वैध, वाचा सविस्तर
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी घंटानाद आंदोलनाची हाक! NCP Sharad Pawar Faction