राज्यातील सर्व सामान्य नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) वतीने राज्यभर गुरुवार, 1 फेब्रुवारी रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक त्रस्त असून ह्या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे हे आंदोलन केले जात असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“सर्वसामान्य लोकांच्या हिताचे मुद्दे घेऊन लढत असलेल्या या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नावरही जोरदार आवाज उठवून झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करायचे आहे. सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून वारंवार केला जात असून त्याचा निषेध करण्यासाठी मावळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता घंटानाद आंदोलन करत तहसिलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.” अशी माहिती दत्तात्रय पडवळ (अध्यक्ष, मावळ विधानसभा) अतुल राऊत (पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग) विशाल वहिले (अध्यक्ष, मावळ विधानसभा युवक) जयश्री पवार (महिला अध्यक्षा मावळ विधानसभा) यांनी दिली. ( NCP Sharad Pawar faction will hold bell ringing protest on February 1 )
अधिक वाचा –
– ‘तळेगाव शहरात आपण नाट्यगृह आणणारच’, आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला विश्वास । mla sunil shelke
– ‘रायगडावर सुवर्ण सिंहासन बनवण्याचा संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प आपण सगळे मिळून साकार करुया’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– बालभारती हा जीवनातील पहिला हस्तस्पर्श – शिक्षण आयुक्त सुरज मांढरे । Balbharati