‘तळेगावसह मावळ तालुका ही कलाकारांची खाण आहे. त्यामुळे मावळवासीय कला रसिकांची नाट्यगृहाची आग्रही मागणी राज्य शासनाकडे करणार असून, ते करूनही घेणार आहोत,’ असा विश्वास मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्य संमेलनाच्या पुणे जिल्हास्तरिय सांगता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाचा पुणे जिल्ह्यातील सांगता समारंभ तळेगाव दाभाडे शहरात नुकताच संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव शहरातून नाट्यदिंडी, मुख्य सांगता समारंभ, प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत चला हवा येऊ द्या कार्यक्रम, असा हा सोहळा तळेगाव नगरिचे मानबिंदू जेष्ठ साहित्यिक कै. गो.नी. दांडेकर व्यासपीठावर पार पडला. चला हवा येऊ द्या चे लोकप्रिय कलाकार – भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रीके, तेजा देवकर, अशिका चोणकर यांनी धमाल उडवून दिली. सिद्धेश्वर झाडबुके आणि हिंदवी पाटील यांनी निवेदन केले. ( closing ceremony of 100th akhil bhartiy natya sammelan talegaon dabhade pune )
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्रीरंग बारणे, पुणे पिपल्स बॅंकेचे संचालक बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे अपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, सिने नाट्य अभिनेते राजन भिसे, माधव अभ्यंकर, सविता मालपेकर, अजित भुरे, माजी नगराध्यक्ष नगरीच्या सरदार अंजलीराजे दाभाडे, जेश्ठ लावणी नृत्यंगणा संगीता लाखे, नाट्य परिशदेचे मध्यवर्ती नियामक मंडळाचे उपाध्यक्ष व पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, तळेगाव शाखेचे अध्यक्ष व परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे सदस्य सुरेश धोत्रे, तळेगाव शाखेचे विश्वस्थ सुरेश साखवळकर, महिला नेत्या सारिका शेळके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– काले पवनानगर ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी रमेश कालेकर यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election 2024
– लेकाच्या लग्नात वरमाईची सोने आणि पैशाने भरलेली बॅग लंपास, सोमाटणे येथील घटना, अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल । Maval Crime News
– वडगावमधील ‘मावळ फेस्टिवल’ कार्यक्रमाला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती! Maval Festival