काले पवनानगर ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी रमेश कालेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळत्या उपसरपंच छाया कालेकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदासाठी सरपंच खंडू कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ह्यावेळी रमेश कालेकर यांचा एकमेव झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र वाडेकर यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले आहे. यावेळी सदस्य प्रवीण घरदाळे, अमित कुंभार, उत्तम चव्हाण, छाया कालेकर, योगिता मोहोळ, आशा कालेकर, रंजना कालेकर, फुलाबाई कालेकर आदी सदस्य उपस्थितीत होते. निवडीनंतर एकमेकांना पेढे भरवून गुलालची उधळण करुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला. ( Ramesh Kalekar has been elected unopposed as Deputy Sarpanch of Kale Pavananagar Group Gram Panchayat )
अधिक वाचा –
– वरसोली ग्रामपंचायतीत महिलांसाठी ‘आस्मिता भवन’, ग्रामस्वच्छतेसाठी प्रत्येक घरात डसबीनचे वाटप । Maval News
– पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील 11 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, पाहा संपूर्ण यादी । Pimpri Chinchwad Police
– पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा ब्लॉक! ‘या’ 12 लोकल गाड्या रद्द, पाहा यादी । Block on Pune Lonavala Railway Route