वरसोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने नव्याने बांधन्यात आलेल्या महिला अस्मिता भवनाचे उदघाटन मावळचे आमदार सुनिल शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, माजी कार्याअध्यक्ष दीपक हुलावळे, सरपंच संजय खांडेभरड, उपसरपंच नलिनी खांडेभरड यांंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वरसोली ग्रुपग्रामपंचायतीने केलेल्या वर्षभरातील केलेल्या विविध विकासकामांची वर्षपूर्ती लोकार्पण सोहळा, तसेच गावातील प्रत्येक घराघरात स्वच्छतेसाठी लागणाऱ्या डसबीनचे देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी वाटप करण्यात आले. यावेळी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, पंढरीनाथ ढोरे, चेअरमन विष्णू गायखे, कार्ला उपसरपंच किरण हुलावळे, माजी सरपंच सारिका खांडेभरड, उपसरपंच बाळासाहेब येवले, ग्रामपंचायत सदस्य अविनाश बालगुडे, नारायण कुटे, विजय महाडिक, राहुल सुतार, सदस्या रजनी कुटे, मंदा पाटेकर, मिना शिद, सिता ठोंबरे, ग्रामसेवक दिपक शिरसाट आदी मान्यवर;
यांसह कैलास हुलावळे, शाम विकारी, अमोल केदारी, राजू खांडेभरड माजी उपसरपंच श्याम येवले, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती खांडेभरड, माजी उपसरपंच नामदेव पाटेकर, शिवाजी खांडेभरड, संतोष खांडेभरड, दत्ता खांडेभरड, माजी उपसरपंच राजू खांडेभरड, भागवत खांडेभरड, माजी सदस्य नवनाथ दाभाडे, गणेश पाटेकर, कृष्णा खांडेभरड, राजू कुटे यांंच्यासह वरसोली, पांगळोली ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरपंच संजय खांडेभरड, सुत्रसंचालन अमोल केदारी, तर आभार सदस्य नारायण कुटे यांनी मानले. ( Asmita Bhavan for women was inaugurated by Maval MLA Sunil Shelke in Varsoli Group Gram Panchayat )
अधिक वाचा –
– श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सांबर हरणाचा जीव वाचवण्यात प्राणीमित्रांना यश, मावळमधील नेसावे येथील घटना । Maval News
– दुःखद! तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गोपाल परदेशी यांचे आकस्मिक निधन, परिसरात शोककळा
– डिजेचा दणदणाट आणि गुलालाची उधळण! मराठा आरक्षण लढ्याला यश मिळताच लोणावळ्यात मराठा बांधवांकडून जल्लोष