मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासह इतर अनेक मागण्यांसाठी मराठा समाजाने आरक्षणाची लढाई सुरु केली होती. सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, लाखो मराठा आंदोलक आणि आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी मुंबईकडे पायी निघाले होते. जरांगेच्या आवाहनानंतर लाखो मराठा रस्त्यावर उतरला. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंतरवाली सराटी ते आझाद मैदान मुंबई कडे मराठ्यांचा पायी मोर्चा निघाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ह्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मोर्चा मुंबईच्या वेशीवर वाशी इथे पोहोचताच सरकारचे धाबे दणाणले. सरकारने आंदोलकांची दृढता पाहून आंदोलकांसोबत सकारात्मक चर्चा केली. तसेच त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत तसे शासन निर्णय आज (दि. 27) काढले. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यभर मराठा बांधवांनी जल्लोष सुरु केला. वाशी येथे मराठा समाजाला आरक्षण दिल्याची घोषणा होताच लोणावळा शहर, खंडाळा, कुसगाव बुद्रूक, कार्ला ग्रामीण परिसरात मराठा समाजातील बांधवांनी एकच जल्लोष केला. ( After success of Maratha reservation fight Entire Maratha Community Cheered In Lonavala Maval )
मराठा समाजाला आरक्षण जाहीर होताच लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पटांगणात एकच जल्लोष केला गेला. मराठा कार्यकर्त्यांनी गुलाल-भंडाऱ्याची उधळण करत फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. तसेच ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणेने परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी डिजेच्या गाण्यांच्या तालावर उत्स्फूर्तपणे नाचत आनंदोत्सव साजरा केला.
अधिक वाचा –
– वडगावमध्ये पीडीसीसी बँकेमार्फत शेतकरी मेळावा; आर्थिक वर्षात 90 टक्के पेक्षा अधिक वसुली केलेल्या शेती संस्थांचा सत्कार
– पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि घात झाला; पवना धरण जलाशयात बुडून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू । Pavana Dam Maval
– ‘मराठ्यांचा विजय झाला असे वाटत नाही..कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकणार नाही..मराठ्यांना फसवलं जातंय..’- वाचा छगन भुजबळ काय बोलले? । Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal