मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा ठाकुरसाई गावच्या हद्दीत पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मनिष शंकर शर्मा (वय 20 रा. मुंबई) असे सदर मयत तरुणाचे नाव आहे. तो अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवारा कॉलेजमधील मेडिकलचे शिक्षण घेत होता. त्याच्यासह एकूण 15 वर्गमित्र पर्यटनासाठी पवना धरण परिसरात आले होते. शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी ही घटना घडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मित्रांच्या ग्रुपमधील 4 विद्यार्थी पवनाधरणात जलपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले. तेव्हा पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने त्यातील दोन विद्यार्थी पाण्यात बुडू लागले. तेव्हा इतर मित्रांनी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिकांनी तिथे धाव घेतली आणि वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात आदित्य सचिन बुंदले (वय 20) याला वाचवण्यात यश आहे. पण मनिष शर्माचा बुडून मृत्यू झालाय. लोणावळा ग्रामीण पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत. ( youth dies after drowning in pavana dam reservoir maval taluka )
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस आणि शिवदुर्ग मित्र मंडळ रेस्क्यू टीम तिथे दाखल झाले. शिवदूर्गच्या माध्यमातून सदर युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गाले, अमोल गवारे, जय पवार, भिमराव वांळुज यांच्यासह स्थानिका आणि शिवदूर्गची टीम यांची यावेळी मदत झाली. पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस तपास पवार साहेब करत आहेत.
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! मराठा बांधवांसाठी आरक्षणाची पहाट उगवली, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मराठा समाजाकडून विजयाचा जल्लोष
– ग्रुप ग्रामपंचायत वरसोली येथील ‘महिला अस्मिता भवन’चे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन । Maval News
– मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा! ‘सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीपर्यंत द्या, उद्या दुपारपर्यंत वाशीत थांबणार अन्यथा पुन्हा मुंबईकडे निघणार…आझाद मैदानावर गुलाल उधळणार’