ग्रुप ग्रामपंचायत वरसोली येथील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि ‘महिला अस्मिता भवन’ उद्घाटन समारंभ आज, शुक्रवार (दि. 26 जानेवारी) रोजी आमदार सुनिल शेळके आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वरसोली ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे. यापुढील काळात देखील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आवश्यक कामांसाठी निधी देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी आमदार शेळकेंनी दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके यांच्या समवेत माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, पंढरीनाथ ढोरे, बाळासाहेब भानुसघरे, विष्णुमामा गायखे, सरपंच संजय खांडेभरड, कैलास हुलावळे, किरण हुलावळे, बाळासाहेब येवले, शाम विकारी, गणेश देशमुख, अमोल केदारी, उपसरपंच नलिनी खांडेभरड, ग्रामसेवक दिपक शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य, महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. ( Mahila Asmita Bhavan at Group Gram Panchayat Varsoli inaugurated by MLA Sunil Shelke )
‘दैनंदिन जीवनात महिला-भगिनी विविध भूमिका सहजतेने पार पाडत असतात. आपल्या कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योग व्यवसायात महिला अग्रेसर होताना आपण पाहतो. त्यांच्या या प्रयत्नांना पाठबळ देण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून आमचे आहे. कौशल्य, प्रशिक्षण व स्वयंरोजगार मार्गदर्शनाचे कार्यक्रम राबविण्यासाठी महिलांना हक्काचे अस्मिता भवन उपलब्ध झाले आहे. महिला सक्षमीकरणासाठी याचा निश्चितच लाभ होईल,’ असे यावेळी बोलताना आमदार शेळके म्हणाले.
ग्रुप ग्रामपंचायत वरसोली येथील विविध विकास कामांचे लोकार्पण व ‘महिला अस्मिता भवन’ उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते आज संपन्न झाला.#maval #development pic.twitter.com/lF2GogNvBy
— Sunil Shelke (@shelkesunilanna) January 26, 2024
अधिक वाचा –
– जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्यांना अटक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई, मंगरूळ गावच्या हद्दीतील घटना । Maval Crime
– दैनिक मावळ ‘संवाद’ : महापुरुषांचे जीवनपट खणखणीत आवाजात उलगडणाऱ्या शाहीर विनता जोशी यांच्यासोबत खास बातचीत । Vinata Joshi
– प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 6 जणांना पद्मभूषण आणि 6 जणांना पद्मश्री जाहीर, पाहा यादी । Padma Awards 2024