महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळांसोबत झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी चौकात भव्य सभा घेतली. या सभेत त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेबद्दल उपस्थित मराठा आंदोलकांना सांगितले. तसेच सरकारने काढलेल्या जीआर आणि इतर निर्णयाची माहिती दिली. आंदोलकांसोबत जाहीररित्या चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाबाबत मोठी आणि महत्वाची घोषणा केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढाई आणि अंतिम लढाई अशी घोषणा करून मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील आणि सोबत लाखो मराठा बांधवांचे भगवे वादळ आज (दि. 26 जानेवारी) वाशी येथे पोहोचले. मराठ्यांच्या मुंबई पायी वारीचा आजचा शेवटचा दिवस आहे, कारण नियोजनानुसार आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य न झाल्यास आजपासून थेट मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्याचा जरांगे यांनी अगोदरच इशारा दिला होता. ( Maratha Reservation Vashi Rally Manoj Jarange Patil Big announcement Will wait For Ordinance then will go to Azad Maidan )
परंतू मराठा आंदोलक मुंबईकडे येत असताना मराठ्यांची ही भगवी लाट पाहता, आणि मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांची कडवी भूमिका पाहता, सरकारने वाशीला पोहोचण्यापूर्वीच शिष्टमंडळांमार्फत शिष्टाईला सुरुवात केली होती. लोणावळा नंतर वाशी मुक्कामी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. आज वाशी येथे सरकारचे मोठे वरिष्ठ शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटले. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही जरांगे यांची फोनवरून चर्चा झाली. एकूण शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर वाशीतील छत्रपती शिवाजी चौकात मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेत आंदोलनाबाबत महत्वाची घोषणा केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –
- शासनाच्या वतीने आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सकाळी चर्चा झाली.
- शासनाला ज्या मागण्या यापूर्वी केल्या त्यासाठी आपण इथे आलोत.
- सरकारची चर्चा झाली पण त्यांचे मंत्री कुणीही आले नव्हते.
- सचिव भांगे साहेब हेच फक्त चर्चेचा निर्णय घेऊन आले होते. त्यांनी एकूण झालेल्या निर्णयाची माहिती सकाळी दिली.
- आपलं म्हणणं 54 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात, ती प्रमाणपत्रे वाटप करा. ही प्रमुख मागणी.
- 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यात ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांची नावे ग्रामपंचायतीत लावावी, ही मागणी होती,
- कारण त्यानंतरच तो अर्ज करू शकतो, दाखल्यासाठी. म्हणून ग्रामपंचायतीत यादी लावा आणि शिबिरे घ्या.
- यावर सरकारचा निर्णय त्यांनी सांगितलाय, आम्ही तुम्ही मुंबईला निघाल्यापासून गावागावात शिबिरे सुरु केल्यात.
- 54 लाख बांधवांच्या नोंदी सापडल्यात त्यामुळे त्यांनी दाखले मिळतील, असे ग्राह्य धरू.
- आता नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सर्व परिवाराला त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र मिळावे, ही दुसरी मागणी आहे.
- एका नोंदीवर 5 जणांना पाच फायदा मिळाला तरीही 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळेल.
- नोंदी मिळाल्यांना वंशावळ जोडल्यानंतर त्यांना फायदा मिळतो, त्यासाठी एक निर्णय शासनाने घेतलाय, समिती गठीत केलीये. त्यानुसार परिवाराने अर्ज केला की त्यांना प्रमाणपत्र मिळेल, त्यासाठी शिबिरे सुरु.
- त्यामुळे आता गावागावात अर्ज करायला पाहिजेत आणि 54 लाख नोंदीप्रमाणे, आरक्षण मिळेल. आणि सामान्य प्रशासनाच्या सचिवांनी सांगितल्याप्रमाणे 54 नाही तर 57 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्यात.
- सामान्य प्रशासनाने सांगितलंय की 37 लाख मराठ्यांना प्रमाणपत्रे दिले आहेत. त्यांनी यादी दिलीये, ती सर्वांना पाठवणार आहे.
- मग बाकीचे कधी, त्यावर त्यांच्या वंशावळी मिळावल्यानंतर त्यांनाही लगेच प्रमाणपत्र मिळणार.
- पण आता ज्यांना दिलेत, त्यांचा डाटा लागेल. तो डाटा आपण मागतोय. हा एक मुद्दा आपला क्लिअर झाला.
- दुसरी गोष्ट शिंदे समिती ही रद्द करायची नाही. या समितीने काम वाढवायचं आणि नोंदी शोधत राहायचं. त्यानुसार सरकारने दोन महिने मुदत वाढवलीये. नंतर टप्प्या टप्प्याने वाढवणार.
- तिसरी गोष्टी म्हणजे, ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या गणगोत सग्या सोयऱ्यांना आरक्षण पाहिजे. त्यांसाठी अद्यादेश पाहिजे, ही मागणी आहे. अद्यादेश महत्वाचा.
- 54 लाख नोंद असल्यांना प्रमाणपत्र, त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र आणि त्यांच्या सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र ह्या मागण्या.
सग्यासोयऱ्यांनी प्रमाणपत्रासाठी शपथपत्र द्यावे, त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यावे, लगेचच द्यावे. ही पुढील मागणी. - शपथपत्राचे पत्र मोफत पाहिजे, त्यासाठी त्यांनी हो म्हटलंय. हा अद्यादेश काढला पाहिजे.
- अतंरवाली सह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्याचे, ही मागणी आहे. त्यावर त्यांनी सरकारने गृह विभागाने याबद्दल आदेश दिले आहे, असे सांगितले. पण तसा पत्र आपल्याला मिळाले पाहिजे.
- वंशावळीसाठी तालुकास्तरीय समिती नेमली जात आहे.
- आपलं म्हणणं असं की, क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय सुप्रिम कोर्टात आहे. कुणबी नोंद आणि सगेसोयऱ्याच्याही यातून एखादा मराठा सुटला तर माननीय सुप्रिम कोर्टातील आरक्षण मार्गी लागेपर्यंत तर अशा मराठ्यांना तर मराठा समाजाला 100 टक्के मोफत शिक्षण करण्यात यावं. निर्णय होईलपर्यंत मराठा समाजाला शंभर टक्के मोफत शिक्षण करण्यात यावं, ही मागणी आहे.
- क्युरेटिव्ह पीटीशन द्वारे मिळणारं आरक्षण आणि सगेसोयऱ्यातून मिळणारं आरक्षण तोपर्यंत मोफत शिक्षण आणि तोपर्यंत तुम्ही एकही शासकीय भरत्या करायच्या नाही. आणि त्या भरत्या करायच्याच असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायचं.
- त्यावर सरकारचं उत्तर आहे की, मुलींना केजी टू पीजी शिक्षण मोफत देणार आहे. पण मुलांचं काय? याचाही शासन निर्णय आम्हाला लागणार आहे. आणि तेही आजच निर्णय़ घ्यावा.
- ईएसडब्ल्यू, ईसीबी च्या नियुक्त्या रखडल्या होत्या, त्यावर त्यांनी कोर्टाला सांगितल्या प्रमाणे 4000 हून अधिक नियुक्त्या केल्याची सांगितले आहे. तसा शासन निर्यय झालाय.
- कोपर्डी घटनेबाबत देखील आपली मागणी मान्य केली.
- हैद्राबाद गॅझेट लागू करा. मराठवाडा आख्खा कुणबी आहे. ते गॅझेट घ्या. महाराष्ट्रातील एकही मराठा सग्यासोयऱ्या शब्दाखाली आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही.
- आता अखेर पण महत्वाचं., सग्या सोयऱ्याबाबत चा शासननिर्णय अध्यादेश व्हायला पाहिजे तो झाला नाही. तो यात नाही. आम्हाला मुंबईत यायची हौस नव्हती. आमची इच्छा आहे, तुम्ही आज आजच्या रात्रीच हा अध्यादेश द्यावा.
- ‘सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीपर्यंत द्या’
- अध्यादेशावर सर्वांच्या सह्या झाल्या आहेत, मग आज अध्यादेश काढाच.
- त्यांचं म्हणणं असं आहे की, सगेसोयरे या शब्दाची व्याख्यासह अध्यादेश देणार आहे. पण आता गुतवून ठेवू नका. आज रात्रीपर्यंत अध्यादेश काढा. आम्ही आजची रात्र इथेच काढू. प्रजासत्ताक दिनाचा आदर ठेवतो. आजची रात्र इथेच काढू, पण मुंबई सोडणार आहे.
- पण आज रात्रीतून अध्यादेश नाही दिला उद्या सकाळी आझाद मैदानावर जाणार. आज 11 वाजता उपोषण सुरु केलंय. फक्त पाणी सुरु आहे.
- आज सायंकाळी, रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत सगेसोयऱ्यांचा अध्यादेश द्या. अन्यथा मुंबईत जाणार. आम्हाला अध्यादेश पाहिजे, डेटा पाहिजे, केसेस मागे घेतल्याचे पत्र पाहिजे, मोफत शिक्षण पाहिजे.
- 15 मिनिटात अध्यादेश देणार असाल तरीही आझाद मैदानावर जाणार. नसेल देणार तरीही आझाद मैदानावर जाणार. आझाद मैदानावर गुलाल उधाळणार.
अधिक वाचा –
– प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 6 जणांना पद्मभूषण आणि 6 जणांना पद्मश्री जाहीर, पाहा यादी । Padma Awards 2024
– खुशखबर! मावळच्या इंद्रायणी भाताला जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, कृषी आयुक्तांचे आमदार सुनिल शेळकेंना आश्वासन
– मावळ तालुक्यातील सावळा गावात 10 दिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; महिलांना कृषी साहित्यांचे वाटप