पुणे जिल्हा परिषद,पंचायत समिती मावळ, तालुका मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले 51 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कामशेत येथील सुमन रमेश तुलसानी टेक्निकल कॅम्पसमध्ये तीन दिवस घेण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील शाळांमधील 140 प्रकल्पांची मांडणी यावेळी करण्यात आली होती. यामध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी प्राथमिक आणि माध्यमिक प्रत्येकी तीन, अदिवासी गट, दिव्यांग गट, शिक्षक व परिचारक गटातील एक-एक प्रकल्पांची निवड करण्यात आली. त्या विद्यार्थांचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
माध्यमिक व उच्च प्राथमिक गटातील विद्यार्थांंना पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, वैज्ञानिक अंकिता नगरकर, मुख्याध्यापक संघ जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड, जिल्हा सचिव प्रसाद गायकवाड, मावळ तालुका मुख्यध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, उपशिक्षणाअधिकारी निलेश धानापुणे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अस्मा मोमिन, डायट अधिव्याख्याता श्रीमती नलावडे शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर चटणे, मावळ शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, तुलसानी कॉलेजच्या प्राचार्या श्रध्दा चव्हाण, विज्ञान संघाचे अध्यक्ष सुरेश सुतार यांंच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. ( Pune District Level Science Exhibition at Kamshet Maval Read Final Result )
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन मुकुंद तनपुरे,ज्योती लावरे यांनी बक्षीस वाचन विकास गायकवाड, संतोष भोसले, मनोज पवार यांनी तर आभार शोभा वाहिले यांनी मानले. विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी जिल्हा व मावळ मुख्याध्यापक संघ, विज्ञान अध्यापक संघ, मावळ सर्व केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती पंंचायत समिती सर्व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : राज्य स्तर निवड
गट 9वी ते 12वी : प्रथम – श्रेयस दर्डे, द्वितीय – अमिशा कुलकर्णी, तृतीय – ज्ञानेश्वरी हरगुडे
आदिवासी विभाग : प्रथम – आदेश गणेश फलके, द्वितीय – राजवीनी हांडे
दिव्यांग गट : प्रथम – रुशील मिलिंद पटाडीया, द्वितीय – राधिका दत्तात्रय कलाल
गट 6वी ते 8वी : प्रथम – धनश्री सुर्यकांत मुंढे, द्वितीय – मयुरी सुभाष काकडे, तृतीय – प्रीती उमेश लांडगे
आदिवासी गट : प्रथम – सिद्धार्थ राजेंद्र राउत, द्वितीय – ईश्वरी कोकणे
दिव्यांग गट : प्रथम – ओम बाजारे, द्वितीय – प्रणव सतीश हरपळे
प्राथमिक शिक्षक गट : प्रथम – एस.पी. खैरमोडे, द्वितीय – नदाब हुसेन मेहबुब
माध्यमिक शिक्षक गट : प्रथम – अरुंधती सुहास अंबिके, द्वितीय – अनिल मारवीन
स्कॉट परिचर गट : प्रथम – सचिन रामदास सोंडकर, द्वितीय दादासाहेब दिनकर पिंगळे
अधिक वाचा –
– प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 6 जणांना पद्मभूषण आणि 6 जणांना पद्मश्री जाहीर, पाहा यादी । Padma Awards 2024
– खुशखबर! मावळच्या इंद्रायणी भाताला जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, कृषी आयुक्तांचे आमदार सुनिल शेळकेंना आश्वासन
– मावळ तालुक्यातील सावळा गावात 10 दिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; महिलांना कृषी साहित्यांचे वाटप