मावळ तालुक्यातील विविध कृषी विषयक उपक्रमांबद्दल चर्चा करण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेतली. यावेळी सहकारमहर्षी पीडीसीसी बँकेचे संचालक माऊलीभाऊ दाभाडे, मावळ कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नथुराम वाघमारे, नितीन जगताप, देवाभाऊ गायकवाड उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘मावळ तालुक्यात कृषी विभागामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सुवासिक इंद्रायणी तांदळाचे आगार म्हणून मावळची ओळख आहे. नागरिकांकडून मागणी वाढत असल्याने इंद्रायणी भाताला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. इंद्रायणी भाताचे गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढविण्याबरोबरच सेंद्रीय पद्धतीने पीक घेण्यासाठी कृषी विभागाकडून भात लावणीपासून ते काढणीपर्यंत मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येईल. तसेच इंद्रायणी भारताला जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करु,’ असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. ( MLA Sunil Shelke Meet Agriculture Commissioner Praveen Gedam Discuss On GI Rating To Indrayani Rice )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात मनोज जरांगे पाटलांचा खास मावळा पगडी देऊन सन्मान; पगडी डोक्यावर चढवताच पाटील भावूक । Manoj Jarange Patil In Lonavala
– किवळे, देहू बाजारपेठ भागात एफडीएचे छापे, तब्बल 35 लाखांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन, वाचा… । Crime News
– मावळमधील पिंपरी बुद्रुक गावात महिलांसाठी समाज केंद्राची उभारणी; बचत गटातील महिलांसाठी प्रथमच ‘लोणचे उद्योगास’ सुरुवात